मुंबई: कर्जमाफी आणि हमी भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज आमदार, खासदारांच्या घर/कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न होत आहे.


अहमदनगरमध्ये भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या घरांसह इतर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

तर तिकडे नंदुरबारमध्ये भाजपच्या खासदार हिना गावित, आमदर विजयकुमार गावित, चंद्रकांत रघुवंशी यांच्याघराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय.



बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी स्वतः संपर्क कार्यालयाला टाळं लावलं. तसंच शेतकरी संपाला पाठिंबा दिला. बार्शीतील त्यांचं निवासस्थान हेच त्यांचं संपर्क कार्यालय आहे.

लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घरासमोर शेतकरी आंदोलन करणार आहेत. मात्र पोलिसांनी अगोदरच सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवास स्थानासमोर आजपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा संप चिघळत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बीड: माजलगावचे भाजप आमदार आर टी देशमुख यांच्या घराला टाळं ठोकलं, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी लावले कुलूप