मुंबई बंद LIVE : मराठा मोर्चाकडून मुंबई बंद स्थगित
मुंबई बंद LIVE - मराठा क्रांती सकल मोर्चाने मुंबई बंद स्थगित केल्याची घोषणा केली
मुंबई बंद LIVE UPDATE
7.55 PM - नारायण राणे ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार 05.40 PM मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची आमदार हर्षवर्धन जाधव यांची मागणी
05.40 PM शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजीनामा, ईमेलद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला
05.35 PM ठाण्यातील आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचा दावा
05.15 PM घणसोली स्टेशनजवळचा रेलरोको थांबला, लोकल वाहतूक सुरु
05.10 PM ठाणे वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे तीन तासांनंतर सुरु
05.05 PM मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरु
05. 00 PM नवी मुंबई कळंबोलीतील रास्ता रोको तब्बल सहा तासांनी मागे
2.40 PM मुंबई, ठाणे, नवी मुंबई बंदही स्थगित, मराठा क्रांती सकल मोर्चाची घोषणा
2.38 PM मराठा क्रांती सकल मोर्चाकडून मुंबई बंद स्थगित
2.36 PM अन्यायाविरुद्ध मराठा समाज एकत्र आला, सरकारमुळे आमच्या हातात दगड, काठ्या आल्या
2.28 PM मुंबई ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प, ठाणे-वाशी, ठाणे नेरुळ मार्गावरील सेवा बंद
1.13 PM या सर्व परिस्थितीला तोंड देताना सरकारला जड जातं आहे. नेतृत्त्व बदलाचा निर्णय मोदी-शाहांना घ्यायचा आहे. मोदी सध्या परदेशात आहेत, पण राज्यातली परिस्थिती चिंताजनक आहे : संजय राऊत
1.07 PM सकल मराठा क्रांती मोर्चा मुंबई समन्वयकांची दुपारी 2 वाजता दादरमधील शिवाजी मंदिर इथे पत्रकार परिषद
1.00 PM नवी मुंबई : घणसोलीमध्ये मराठा आंदोलकांचा ट्रेनवर चढून रेलरोको
12.44 PM मुंबई : वरळीत मुंडन करुन मराठा आंदोलकांनी सरकारचं श्राद्ध घातलं https://goo.gl/JrfWjB
12.05 PM कल्याण : मराठा समाजाच्या भव्य मोर्चाला सुरुवात, हजारो आंदोलक सहभागी
11.47 AM सांगली कृष्णा नदी पात्रातील जलसमाधी आंदोलन संपले, कार्यकर्ते नदीबाहेर
11.23 AM दादरमध्ये सकाळी 11 नंतरही सर्व दुकानं बंद, अत्यावश्यक सेवा सुरु
11.10 AM नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे गंगापूर धरणात आंदोलन, 20 कार्यकर्ते ताब्यात
11.01 AM नाशिक : शालीमार परिसरात मराठा आंदोलकांकडून व्यावसायिकांची दुकानं बंद, आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी, मोठा पोलिस फौजफाटा तैनात
10.57 AM रायगड : मराठा आंदोलनामुळे मुंबई-गोवा हायवेवर पनवेलकडे जाणारी वाहतूक पळस्पेजवळ वळवली
10.45AM अकोल्यात मराठा समाजानं पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद. शहरातील मुख्य बाजारपेठ, शाळा-महाविद्यालयं पूर्णत: बंद. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त
10.40 AM दादर पूर्व स्टेशन बाहेर आंदोलकांचा रस्त्यावरच ठिय्या, दादर, हिंदमाता, परिसरातील दुकाने बंद केली, केईएम, टाटाकडे जाणारी टॅक्सी सेवा रोखली
10.30 AM मुंबईच्या प्रवेशद्वारावर मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी बंद आणि रस्ता रोको केला. पोलिसांनी सामंजस्य दाखवत काही वेळ या कार्यकर्त्यांना रस्त्यावरही बसू दिलं. यामुळे काही वेळ सर्व बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर या कार्यकर्त्यांना समजावत रस्त्यावरून बाजूला झाले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. काही कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे पुन्हा रस्त्यावर उतरत असताना त्यांना समजावत बाजूला केले.
10.30 AM कल्याण - शिवाजी चौकात मराठा मोर्चेकरी दाखल होण्यास सुरुवात, मोर्चेकऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कसारा या भागातले मराठा कार्यकर्ते मोर्चात सहभागी
10.29 AM दादरमध्ये शिवसेना भवनकडे येणारा रस्ता मराठा आंदोलकांनी रोखला
10.26 AM घाटकोपर भटवाडी इथे आंदोलकांची गर्दी, दुकानदार, भाजीवाल्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन, बस थांबवल्या
10.25 AM ठाणे- लोकलवर दगडफेक, ट्रेन रोखल्या
10. 16 AM मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीनंतर लालबागचा राजा मार्केटमधील सर्व दुकानं बंद
10.15 AM ठाणे स्टेशनवर मराठा आंदोलकांनी लोकल रोखली, आंदोलकांना ट्रॅकवरुन हटवण्याचा प्रयत्न
10.05 AM वांद्र्यात मराठा आंदोलकांकडून दुकानदारांना हात जोडून दुकानं बंद करण्याची विनंती
10.03 AM नवी मुंबई : कोपरखैरणेत मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला, सर्व दुकाने बंद
10.03 AM ठाण्यात मॅकडोनाल्ड्स बंद करण्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक, पोलिसांनी आंदोलकांना हटवलं
ठाण्यात मॅकडोनाल्ड्स बंद करण्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक, पोलिसांनी आंदोलकांना हटवलं https://t.co/iUcOyvc63X pic.twitter.com/l2LSKiCSGm
— ABP माझा (@abpmajhatv) July 25, 2018
9.53 AM नालासोपारा तुलिंज रोड येथून मराठा सामाजाचा मोर्चा निघाला आहे. दुकान बंद करत आहेत. रस्त्यावर ठिय्या मांडून कार्यकर्त्यांनी वाहने अडवली आहेत.
ठाणे कडकडीत बंद... टीएमटीच्या बसेस थांबवल्या, लोक उतरून चालत गेले.. नौपाडा, गोखले रोड वर आंदोलनकर्ते! मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी #ठाणे #महाराष्ट्र_बंद #मराठामोर्चा pic.twitter.com/lgDt66Ittl
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) July 25, 2018
9.41 AM परळ-शिवडी भागात मराठा आंदोलक रस्त्यावर, दुकानं बंद करण्यास सुरुवात, सरकारविरोधी घोषणाबाजी करत परळ गावातून मोर्चा निघाला
9.36 AM आंदोलनाआधी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांची माहिती
9.25 AM ठाण्यात दुकानं बंद, फक्त रस्त्यावरुन वाहतूक सुरु
9.15 AM शांततेत आंदोलन करा, मुंबई पोलिसांचं मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना आवाहन. तसंच कोणतीही अडचण आल्यास किंवा अप्रिय घटना घडल्यास 100 नंबर आणि ट्विटर अकाऊंटवर माहिती द्या - मुंबई पोलिस
8.58 AM ठाणे ते मुंबई रस्त्यावरुन बाजूला झालेले आंदोलनकर्ते पुन्हा रस्त्यावर, पुन्हा वाहतूक रोखली
8.49 AM नवी मुंबई - मनपा परिवहन समितीने 67 एसी बस बंद केल्या आहेत . खबरदारीचा उपाय म्हणून एसी बस बंद. अन्य बस सुरू आहेत.
8.50 AM ठाणे ते मुंबई रस्त्यावरुन आंदोलनकर्ते बाजूला, वाहतूक धीम्या गतीने सुरु
8.30 AM - ठाणे - तीनहात नाक्यावर आंदोलकांची घोषणाबाजी, आरक्षणाची मागणी, मुंबईकडे येणारी वाहतूक रोखली
8.23 AM आजच्या बंदमध्ये अजिंक्यतारा टॅक्सी संघटनेचा सहभाग. संघटनेची एकही टॅक्सी धावणार नाही. अजिंक्यतारा संघटनेच्या 350 हून अधिक टॅक्सी रस्त्यावर धावतात. इतर टॅक्सी संघटनांनाही बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन
8.20 AM ठाण्यात मुख्यमंत्री हाय हायच्या घोषणा
मुख्यमंत्री हाय हायच्या घोषणा! #मराठामोर्चा #ठाणे #महाराष्ट्र_बंद pic.twitter.com/RKaeL4XOy9
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) July 25, 2018
8.05 AM ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात टीएमटी बसची तोडफोड
7.45 AM घणसोली, नवी मुंबई येथे आज पहाटे दोन बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंत बेस्ट बस सेवा बंद आहे. मुलुंडकडून वाशीच्या दिशेने जाणारी बससेवा ऐरोलीपर्यंत चालविण्यात येत आहे.7.30 AM - मराठा आरक्षणाला पाठिंबा, मात्र मुंबई बंदला पाठिंबा नाही, शिवसेनेची भूमिका
मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा, मात्र आजच्या बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नाही. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शिवसेनेचा निर्णय. आजच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचे सर्व शिवसैनिकांना आदेश. काल खा. चंद्रकांत खैरे यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर शिवसेनेची भूमिका. परळीच मराठा आंदोलनाचं केंद्र मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांची चर्चा फक्त परळी येथूनच होतील, सरकारने इतर लोकांशी बोलू नये, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली. काय आहेत मागण्या?