Mumbai: एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय महिला वकिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आलीय. ही घटना मुंबईच्या (Mumbai) अंधेरी (Andheri) परिसरात 19 जानेवारीला घडली होती. याप्रकरणी संबंधित महिलेनं स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश कासार (वय, 29) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी हा पालघर येथील रहिवाशी आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "19 जानेवारी रोजी रात्री 8.40 च्या सुमारास संबंधित महिला वकील अंधेरी येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी व्यक्तीनं एटीएममध्ये प्रवेश करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या हातातून पैसे घेऊन पळून गेला. त्यानंतर महिला वकिलानं याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला."
त्यानंतर पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. तसेच पोलिसांनी बँक ऑफ बडोदाकडे घटनेच्या 5 मिनिट आधी आणि पाच मिनिट नंतर एटीएएम मशीन वापरून पैसे काढणाऱ्यांची माहिती मागितली. बॅंकनं 12 लोकांची माहिती दिली. या 12 लोकांचे पत्ते आणि उर्वरित माहितीचे विश्लेषण केले असता, नालासोपारा येथे आलेला संशयितही तसाच होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा नंबर ट्रक करुन त्याला अटक केलं. चौकशीदरम्यान, आपणच या महिलेची छेडछाड केल्याचं आरोपीनं कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 354 आणि 394 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, अंधेरी गुन्हे शाखेचे पीआय शिवाजी पोवडे यांनी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पगारे, हवालदार राजेंद्र पेडणेकर, हवालदार हेमंत सुर्यवंशी, हवालदार प्रविण जाधव, हवालदार अविनाश कापसे, हवालदार सागर सोनजे, हवालदार विजयानंद लोंढे, हवालदार विजय मोरे, आणि हवालदार विशाल पिसाळ याप्रकरणाची चौकशी करीत होते.
हे देखील वाचा-
- Club House App : क्लब हाऊस अॅप प्रकरणातील आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची कामगिरी
- कौतुकास्पद! जर्मन नौदलाच्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक खालावली, भारतीय नौदलाकडून तात्काळ मदत
- Mumbra News : पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही, घरांबाबतच्या मध्य रेल्वेच्या नोटिशीनंतर खासदार शिंदेंची आक्रमक भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha