Club House App : सुली डील्स आणि बुल्ली बाई अॅपनंतर, ऑडिओ-चॅट अॅप्लिकेशन 'क्लब हाउस' या अॅपबद्दल सध्या गोंधळ सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या पश्चिम विभागाने 'क्लबहाऊस' अॅपवर मुस्लिम महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत 'क्लबहाऊस' (Club House App )अॅप वादातील आरोपीला हरियाणातील कर्नाल येथून अटक करण्यात आली आहे, तर 2 तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.


मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'क्लबहाऊस' अॅपवर 2 ग्रुपचे मॉडरेटर KLA XD ऊर्फ आकाश (19 वर्ष) याला कर्नाल येथून अटक करण्यात आली. सायबर पोलिसांना 3 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे. तर, या प्रकरणातील आरोपींना मुंबईत आणून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय पोलिसांनी 21 वर्षीय जयष्णव कक्कर आणि यश पराशर या 2 तरूणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. 


शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची कारवाईची मागणी 


विशेष म्हणजे, रझा अकादमी या मुस्लिम संघटनेने मुंबई पोलिसांना पत्र लिहून मुस्लिम समाजातील महिलांविरोधात अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी करण्याची मागणी केली आहे. बुल्लीबाईंच्या धर्तीवर क्लबहाऊस अॅप चालवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. 


पोलीस आयुक्त डॉक्टर रश्मी करंदीकर यांनी पडताळणीचे दिले आदेश


मुंबई पोलीस सायबर विभागाच्या पोलीस आयुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी विशेष पथक तयार करून शेवटपर्यंत तपास करण्याचे निर्देश दिले होते. सायबर पोलिसांनी जास्त वेळ न दवडता आरोपींना पकडले. क्लबहाउस अॅप हे ऑडिओ चॅटवर आधारित एक सोशल नेटवर्किंग अॅप आहे. या अॅपद्वारे, यूजर्स त्यांच्या आवडीच्या विविध विषयांवर त्यांच्या आवडीच्या लोकांशी बोलू शकतात किंवा चर्चा करू शकतात.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha