मुंबई : भारतीय नौदलाची (Indian Navy) एक कौतुकास्पद कामगिरी समोर आली आहे. अचानक तब्येत खालावलेल्या जर्मन नौदलाच्या अधिकाऱ्याला भारतीय नौदलाकडून त्वरित वैद्यकीय सेवा आणि मदत पुरवली गेली. भारतीय नौदलाने मुंबईपासून सुमारे 275 किमी अंतरावर असलेल्या जर्मन नौदल जहाज बायर्नमधून बाहेर काढलेल्या अधिकाऱ्याला त्वरित वैद्यकीय सेवा आणि मदत दिली आहे.


जर्मन जहाजावर असलेल्या नौदल अधिकाऱ्याची तब्येत अचानक खालावल्याने भारतीय नौदलाकडून त्या जर्मन अधिकाऱ्याला मदत करून त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.






जर्मन दूतावासाच्या विनंतीच्या आधारे, रुग्णाला वेस्टर्न नेव्हल कमांडद्वारे समन्वयित जहाज-जनित सुपर लिंक्स हेलिकॉप्टरद्वारे आयएनएस शिक्रा येथे उतरवण्यात आले.






नौदल रुग्णालय INHS अश्विनी येथे या जर्मन अधिकाऱ्याला आणण्यात आले आहे, अधिकाऱ्याला तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत असून रूग्णाची प्रकृती आता स्थिर असून निरीक्षणाखाली आहे.



दरम्यान, जर्मन नौदलाचे फ्रिगेट बायर्न, F217 आज मुंबईत दाखल झाले. या युद्धनौकेचे भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे प्रोटोकॉल, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले.






.





LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha