मुंबई : चांदीवाल आयोगासमोर (chandiwal Commission) सचिन वाझेनं (Sachin Vaze) स्वतः अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) प्रश्न विचारले आहेत. अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्यासाठी सचिन वाझेंना अनुमती देण्यात आली आहे. मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया प्रकरणाबाबत ही मोठी घडामोड आहे. दरम्यान, अँटिलिया स्फोटक प्रकरणापासून सचिन वाझे वादाच्या भोवऱ्याच सापडले आहेत. या प्रकरणाला आतापर्यंत अनेक फाटे फुटले आहेत. अशातच आज सचिन वाझेनी चांदिवाल आयोगासमोर थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रश्न विचारल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. 


चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना प्रश्न : 


सचिन वाझे : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात 30 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या जीआरचा तुम्ही भाग होता का?


अनिल देशमुख : परमबीर सिंह यांनी माझ्यावर लावलेल्या आरोपांना कोणताही आधार नसून ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं होतं 


सचिन वाझे : मला विचारायचे आहे की तुम्ही 30 मार्चच्या सरकारी ठरावाचा भाग होता का?


अनिल देशमुख : मी मुख्यमंत्र्यांना समिती नेमण्याची विनंती केली होती.


सचिन वाझे : तुम्हाला GR बद्दल कधी कळले?


अनिल देशमुख : हा जीआर पब्लिक डोमेनमध्ये आला तेव्हा कळलं


सचिन वाझे : स्पेशल आयजी आणि आयजीमध्ये काही फरक आहे का?


अनिल देशमुख : मला याचं उत्तर द्यायचं नाही. 


सचिन वाझे : मुंबई पोलीस आयुक्तांनी डीजीपींना अहवाल द्यावा असे म्हणणे योग्य ठरेल का?


अनिल देशमुख : नियमांनुसार करावं लागतं. 


सचिन वाझे : गुन्हे शाखेचे सहआयुक्तांना आयुक्त, डीजीपी, एसीएस होम यांना अहवाल द्यावा लागतो 


अनिल देशमुख : केवळ आयुक्तांनाच.


सचिन वाझे : हेमंत नगराळे मुंबईचे आयुक्त होण्यापूर्वी DGP होते. 


अनिल देशमुख : हो 


सचिन वाझे : मला CIU चा मुख्य प्रभारी बनवण्यात आल्याचे तुम्हाला कधी कळले?


अनिल देशमुख : मला काही तक्रारी आल्या की, वऱ्हे यांना 14-15 वर्षांसाठी निलंबित करून त्यांना CIU चा प्रभारी बनवण्यात आलं. साधारणतः सहसा, निलंबित अधिकाऱ्याला साइड पोस्टिंग दिले जाते, जरी ते साइड पोस्टिंगवर होते परंतु एक दिवसासाठी. सिंग यांच्या तोंडी आदेशानंतर वाजे यांना सीआययूचे प्रभारी बनवण्यात आले. यानंतर सहआयुक्त गुन्हे संतोष रस्तोगी यांनीही विरोध केला.


सचिन वाझे : तुम्ही सांगू शकता की, असा काही नियम आहे की, ज्या अंतर्गत एपीआयला युनिटचा प्रभारी बनवता येत नाही


अनिल देशमुख : एखादा नियम असेल


सचिन वाझे : तुम्हाला भेटीबद्दल कधी कळालं? 


अनिल देशमुख : सचिन वाझेला CIU इन्चार्ज 10 जून रोजी केलं होतं. मला काही दिवसांनी तक्रारी मिळाल्या तेव्हा समजलं. 


सचिन वाझे : कोणी तक्रार केली?


अनिल देशमुख : अनेक तक्रारी तोंडी होत्या पण कदाचित अनेक लेखी तक्रारीही विभागाकडे आल्या आहेत.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha