एक्स्प्लोर
Advertisement
मेट्रोच्या कामासाठी गिरगावातील 130 वर्ष जुनी चाळ पाडणार!
15 फेब्रुवारीपर्यंत इथल्या 118 कुटुंबाना घर रिकामं करावं लागणार आहे. मात्र, यासाठी कोणाचाच पाय निघेनासा झाला आहे.
मुंबई : मुंबईत सर्वत्र मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. या कामामुळे मुंबईच्या गिरगावात असलेली 130 वर्ष जुनी क्रांतीनगर चाळ आता कायमची पाडली जाणार आहे. ज्या ठिकाणी आपल्या चार पिढ्या वाढल्या, ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो ती वास्तू आता सोडवी लागणार असल्याने तिथल्या राहिवाशांनी सोबत येत एक शेवटचं स्नेहमिलन केलं.
मुंबईत कुलाबा सिप्झ मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यात गिरगावातील 130 वर्ष जुनी क्रांतीनगर चाळ येत असल्याने, आता या चार पिढ्याची आठवण असलेल्या वास्तूला पाडलं जाणार आहे. अचानक येथील राहिवाशांना प्रकल्पग्रस्त केल्याने आता ही चाळ सोडून इतरत्र घर शोधण्याचं संकट यांच्यासमोर आलं आहे. मात्र, त्यात सुद्धा हे रहिवासी चाळीत पुन्हा राहता येणार नसल्याने शेवटचा स्नेहमिलन कार्यक्रम करत आहेत.
हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम सगळ्यासाठी जड काळीज करुन दुःखात आनंद व्यक्त करण्यासाठी केलेला खटाटोप आहे. ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो, या ठिकाणापासून आता आपल्याला निघावं लागणार असल्याने, लहानपणीच्या आठवणी इथले रहिवासी या कार्यक्रमात साजरा करत होते. चाळी सोडून गेलेले सुद्धा या कार्यक्रमात पुन्हा एकत्र आलेले पाहायला मिळाले
15 फेब्रुवारीपर्यंत इथल्या 118 कुटुंबाना घर रिकामं करावं लागणार आहे. मात्र, यासाठी कोणाचाच पाय निघेनासा झाला आहे. शिवाय आम्हाला इथेच राहू द्या, अशी विनंती ते मेट्रो प्राधिकरणाला करत आहेत. मात्र, आता यावर काहीही होणार नसल्याने काही दिवसांनी का होईना चाळी नसली तरी याच भागात आमचं पुर्नवसन करा, अशी मागणी या राहिवाशांनी केली आहे. तसं आम्हाला काही वर्षांनी जरी बिल्डिंग बांधून देणार असाल तर आम्हाला एकत्र एकाच ठिकाणी घरं द्या, अशी कळकळीची विनंतीही ते करत आहेत.
हा कार्यक्रम जरी या चाळीतील शेवटच्या स्नेहमिलनाचा असला तरी दु:खाचा लवलेश ते चेहऱ्यावर येऊ देत नाहीत. आता आपल्याला या चाळीत राहत येणार नाही, सोबत सण साजरे करता येणार नाहीत हा विचारही त्यांना अवघड जात आहे. एकीकडे चाळ संस्कृती लोप पावत असताना आहे, त्यात या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात चाळ संस्कृती पूर्णपणे संपुष्टात येईल, असंच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement