एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या, मुलुंडमधील खळबळजनक घटना
मुलुंड येथील वसंत ऑस्कर इमारतीमध्ये एका तरुणाने स्वतःच्या वडील, आजोबा यांची चाकूने वार करून हत्या केली असून स्वतः सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शार्दूल मांगले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मुंबई : मुलुंड येथील वसंत ऑस्कर इमारतीमध्ये एका तरुणाने स्वतःच्या वडील, आजोबा यांची चाकूने वार करून हत्या केली असून स्वतः सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शार्दूल मांगले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान त्याने त्याचे वडील मिलिंद मांगले आणि आजोबा सुरेश मांगले यांच्यावर चाकूने वार केले. या वेळी त्यांचा केयरटेकर अनंत कांबळे घरात होता. त्याने या लोकांना प्रथम वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र शार्दूलचे कृत्य पाहून तो बाथरुममध्ये कडी लावून लपला. त्यामुळे त्याने ही सर्व घटना पाहिली. सध्या घटनास्थळी मुलुंड पोलीस दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल होत आहेत.
(सविस्तर वृत्त लवकरच...)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
भारत
Advertisement