एक्स्प्लोर
VIDEO : मुडके ना देखो, मुकेश अंबानींचा लेकीसोबत डान्स
मुकेश अंबानी यांनी लेक इशासोबत केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
![VIDEO : मुडके ना देखो, मुकेश अंबानींचा लेकीसोबत डान्स Mukesh Ambani dances to 'Dilbaro' with daughter Isha Ambani on her engagement latest update VIDEO : मुडके ना देखो, मुकेश अंबानींचा लेकीसोबत डान्स](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/09125929/Isha-Mukesh-Ambani-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या इशा लवकरच पिरामल घराण्याची सून होणार आहे. इशा आणि आनंद यांच्या साखरपुड्यात अंबानी दाम्पत्यानेही ताल धरला. मुकेश अंबानी यांनी लेकीसोबत केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आलिया भट्टच्या आगामी 'राझी' चित्रपटातील 'दिलबरो' गाण्यावर इशा आणि मुकेश अंबानी यांनी डान्स केला. 'मुडके ना देखो दिलबरो' हे गाणं बाप-लेकीच्या नात्यावरच आधारित आहे.
इशाची आई नीता अंबानी यांनीही श्रीदेवीच्या गाजलेल्या 'नवराई...' गाण्यावर ठुमके लगावले होते.
अंबानींनी अँटिलियामध्ये आयोजित केलेल्या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, रणबीर कपूर, करण जोहर, अयान मुखर्जी असे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.
पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत इशा लगीनगाठ बांधणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातच हा विवाहसोहळा होईल.
कोण आहेत आनंद पिरामल?
आनंद पिरामल देशातील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या पिरामल रिअल्टीचे कार्यकारी संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची सुरुवात केली होती. ‘पिरामल स्वास्थ्य’कडून आज एकाच दिवसात तब्बल 40 हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केला जातो. आनंद पिरामल इंडियन मर्चंट चेंबरच्या युवा विंगचे सर्वात कमी वयाचे अध्यक्षही होते. आनंद पिरामल यांनी पेन्सिल्वेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात ग्रॅज्युएशन केलं. तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली. सर्वात श्रीमंत उद्योगपतीची एकुलती एक मुलगी ईशा 26 वर्षीय ईशा अंबानी रिलायन्स जिओ आणि रिटेल बोर्डाची सदस्य आहे. तिने प्रसिद्ध येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशिया अभ्यासात ग्रॅज्युएशन केलं आहे. ईशा याच वर्षी स्टॅण्डफोर्डच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर पूर्ण करणार आहे. लग्नाचा प्रस्ताव कसा आला? अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांचे मैत्रीचे संबंध होते. शिवाय इशा आणि आनंद यांचीही मैत्री होती. या मैत्रीचं रुपांतर नात्यामध्ये करायचं होतं. यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील एका मंदिराची निवड करण्यात आली. लग्नाचा प्रस्ताव पिरामल कुटुंबीयांकडून आला. आनंद पिरामल यांनी महाबळेश्वरच्या मंदिरात इशाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि हा प्रस्ताव दोन्हीही कुटुंबीयांनी मान्य केला. यावेळी अंबानी आणि पिरामल कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. लग्नाची बोलणी झाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी सोबत जेवण केलं. संबंधित बातम्या :नीता अंबानींचा भन्नाट डान्स, मुलीच्या लग्नापूर्वी व्हिडीओ व्हायरल
मुकेश अंबानींची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)