मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना धमकी; म्हणाले बंगला उडवून देऊ
Celebs Death Threats : दहशतवादी हल्ले करण्यासाठी 25 जण शस्त्रांनी सुसज्ज मुंबईतील दादरला पोहोचले असल्याचा दावाही कॉलरने केला आहे.
Celebs Death Threats : एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया, बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा बंगला आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. नागपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना एका निनावी कॉलबद्दल सतर्क केले. त्यानंतर बॉम्बशोधक पथके सर्व ठिकाणी शोध घेत आहेत. दहशतवादी हल्ले करण्यासाठी 25 जण शस्त्रांनी सुसज्ज मुंबईतील दादरला पोहोचले असल्याचा दावाही कॉलरने केला आहे.
मंगळवारी दुपारी नागपुरात महाराष्ट्र पोलिसांच्या "डायल वन वन टू" या सेवेच्या नागपुरातील कॉल सेंटरला एक धमकीचा कॉल आला होता. त्या कॉलमध्ये मुंबईतील काही ठिकाणांसंदर्भात धमकी देण्यात आली होती. त्याबद्दल नागपूरातील कॉल सेंटर वरून लगेचच मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली होती, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी नंतर झालेल्या तपासात फोन करणारा हा मुंबईच्या हद्दीतूनच फोन करत आहे असे निष्पन्न झाले.त्यामुळे या धमकीच्या कॉलचा आणि कॉल करणाऱ्याचा नागपूरशी संबंध नाही असेही अमितेश कुमार यांनी सांगितलं. फक्त तो कॉल महाराष्ट्र पोलिसांच्या "डायल वन वन टू" या सेवेच्या नागपूर कॉल सेंटरला कनेक्ट झाला होता, एवढाच संबंध नागपूरचा होता. महाराष्ट्र पोलिसांच्या डायल वन वन टू या सेवेचे राज्यात दोन कॉल सेंटर असून एक नवी मुंबईत आहे... तर दुसरा नागपुरात आहे... वन वन टू वर कॉल केल्यानंतर प्राधान्याने नवी मुंबईच्या कॉल सेंटरला कॉल कनेक्ट होतो.. मात्र काही कारणांनी तिथे कॉल कनेक्ट झाला नाही.. तर तो नागपूरच्या कॉल सेंटरला कनेक्ट होतो..
काल दुपारी नागपुरात महाराष्ट्र पोलिसांच्या "डायल वन वन टू" या सेवेच्या नागपुरातील कॉल सेंटरला एक धमकीचा कॉल आला होता... त्या कॉल मध्ये मुंबईतील काही ठिकाणांसंदर्भात धमकी देण्यात आली होती.. त्याबद्दल नागपूरातील कॉल सेंटर वरून लगेचच मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया, बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा बंगला आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब ठेवल्याची धमकी कॉलवर अज्ञात व्यक्तीने केली होती. त्याशिवाय दहशतवादी हल्ले करण्यासाठी 25 जण शस्त्रांनी सुसज्ज मुंबईतील दादरला पोहोचले असल्याचेही त्याने सांगितलं होतं. नागपूर पोलिसांनी यााबबत तात्काल मुंबई पोलिसांना माहिती देत सतर्क केले. याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती घेतली जात आहे.