MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
MPSC Exam Marks : UPSCच्या धर्तीवर पहिल्यांदाच एमपीएससीने मुख्य परीक्षा लेखी पद्धतीने घेतली. मात्र वेगवेगळ्या विषयांच्या गुणांमध्ये मोठी तफावत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

मुंबई : पेपरफुटीमुळे चर्चेत आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीचा (MPSC) गोंधळ सुरूच असून आता राज्यसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेतही घोळ असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना 250 पैकी 2, 6 आणि 11, 14 असे गुण मिळाले आहेत. तर काही विद्यार्थी हे मराठी या क्वालिफाईंग पेपरमध्येच नापास झाले आहेत. गुणांची तफावत लक्षात घेता हे पेपर्स तपासताना पारदर्शकता ठेवण्यात आली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
आयोगाकडून मुख्य परीक्षेसाठी यूपीएससीच्या धर्तीवर पहिल्यांदाच लेखी परीक्षा घेण्यात आली. त्याचे गुणही जाहीर करण्यात आले आहेत. मात्र आता त्यावरही विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटल्याने आयोगाच्या कारभारावर टीका होत आहे. त्याचसोबत इतरही परीक्षांविषयी शंका उपस्थित होत आहे. त्यात आता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या गुणांच्या तफावतेचा मुद्दा समोर आल्याने आयोगाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आल्याचं दिसतंय.
MPSC Mains Exam Marks Variation : विद्यार्थ्यांच्या तक्रारी काय आहेत?
- निबंधाच्या आणि जीएस पेपरच्या गुणांमध्ये मोठी तफावत.
- निबंधाच्या पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांना 150 हून जास्त गुण, तर काही विद्यार्थ्यांना 14 किंवा अगदीच कमी गुण
- ऑप्शनलच्या एका पेपरमध्ये खूप गुण, तर दुसऱ्या पेपरमध्ये अगदीच कमी गुण.
- काही विषयांमध्ये 100 हून अधिक गुण, तर काही विषयांमध्ये खूपच कमी गुण.
- समाजशास्त्रासारख्या काही ऑप्शनल पेपर्समध्ये तुलनेने कमी गुण.
- इतर विषयांमध्ये चांगले गुण असले तर मराठी आणि इंग्रजी या क्लालिफाईंग पेपरमध्ये एखाद्या दुसऱ्या गुणांनी नापास होणे. काही विद्यार्थ्यांना 300 पैकी आवश्यक 75 गुणही न मिळाल्यामुळे ते मुलाखतीसाठी पात्र ठरले नाहीत.
- काही विद्यार्थ्यांना ऑप्शनल विषयांमध्ये 500 पैकी 100 ते 125 गुण मिळाले आहेत.
- ऑप्शनल विषयांच्या दोन पेपर्सच्या गुणांमध्ये मोठी तफावत.
- एका विद्यार्थ्याला तर एका भूगोल या ऑप्शनल विषयाच्या पहिल्या पेपरमध्ये 121 गुण मिळाले आहेत, तर दुसऱ्या पेपरमध्ये 250 पैकी अवघे 2 गुण मिळाले आहेत.
- फिलॉसॉफी विषयामध्येही एका विद्यार्थ्याची तशीच गत झाली आहे. त्याला एका पेपरमध्ये 250 पैकी फक्त 6 गुण मिळाले आहेत.
- एका विद्यार्थ्याला समाजशास्त्र या ऑप्शनल विषयामध्ये 250 पैकी फक्त 11 गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या विद्यार्थ्याला फक्त 6 गुण मिळाले आहेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर तपासणीमध्ये घोळ असल्याबाबत विद्यार्थ्यांचे म्हणणे असून अनेक विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये अगदी २, ४, ६ इतके नगण्य गुण देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतही MPSC च्या सचिवांसोबत चर्चा झाली आणि याची त्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करणार असल्याचं… pic.twitter.com/rdfrm1UnzT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 1, 2026
ही बातमी वाचा:
Before You Go
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य






















