एक्स्प्लोर

मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार

MPSC Exams CBT Pattern : यापूर्वी परीक्षांचे निकाल आणि पुढील टप्प्यांमध्ये मोठा विलंब होत असल्याने उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अनिश्चितता आता संपणार आहे.

MPSC Exams CBT Pattern : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा आता ओएमआर (OMR) उत्तरपत्रिकांऐवजी संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या नव्या सुधारणांमुळे परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करणे आयोगाला शक्य होणार आहे.  यापूर्वी परीक्षांचे निकाल आणि पुढील टप्प्यांमध्ये मोठा विलंब होत असल्याने उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अनिश्चितता संपवण्यासाठी आयोगाने आता कालबद्ध नियोजन केले आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल आयोगाने अवघ्या 22 दिवसांत प्रसिद्ध करून एक नवा रेकॉर्ड केला आहे. यापुढे ही गती आणखी वाढवून सर्व पूर्व परीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आतच जाहीर केले जातील.

MPSC Recruitment Target : एकाच वर्षात भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य

ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षाअखेरीस तिची अंतिम भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:

मुलाखत असलेली पदे : ज्या पदांसाठी मुलाखती आवश्यक असतात, त्यांची संपूर्ण निवड प्रक्रिया आता केवळ 9 ते 11 महिन्यांत पूर्ण केली जाईल.

केवळ लेखी परीक्षा असलेली पदे : ज्या पदांना मुलाखत नसते, अशा परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया 6 ते 7 महिन्यांत पूर्ण केली जाईल.

या गतिमान प्रक्रियेमुळे उमेदवारांचे वर्षानुवर्षे रखडणारे नुकसान टळणार असून त्यांच्या करिअरवरील अनिश्चिततेचे ढग दूर होतील, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.

MPSC Mains Exam Pattern : मुख्य परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल नाही

ही सीबीटी (CBT) पद्धत केवळ आणि केवळ पूर्व परीक्षांसाठीच लागू असणार आहे. राज्यसेवा, गट 'अ', गट 'ब' किंवा गट 'क' च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक आणि ठरलेल्या पद्धतीनेच पार पडतील.

MPSC Exam New Pattern  : सीबीटी आणि नॉर्मलायझेशन पद्धत वैज्ञानिक

सीबीटी आणि नॉर्मलायझेशन (Normalization) ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रासाठी कोणतीही नवी पद्धत नाही. एमपीएससीने आतापर्यंत सुमारे 140 परीक्षा सीबीटी प्रणालीनुसार अत्यंत यशस्वीपणे घेतल्या आहेत. ही प्रणाली पूर्णपणे वैज्ञानिक, न्यायालयाने मान्यता दिलेली आणि देशभरात स्वीकारलेली पारदर्शक पद्धत आहे.

देशातील मोठ्या भरती संस्थांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दरवर्षी लाखो उमेदवारांची परीक्षा याच पद्धतीने घेते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने (RRB) तर सुमारे 1 कोटी उमेदवारांची भरती परीक्षा याच सीबीटी आणि नॉर्मलायझेशनद्वारे यशस्वीपणे पूर्ण केली आहे. महाराष्ट्रातही 'सीईटी सेल'ने नुकतीच 16.30 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा याच पद्धतीने घेतली असून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) देखील याच पद्धतीचा वापर करते. या डिजिटल पद्धतीमुळे पेपर फुटीचे आणि विलंबाचे प्रकार पूर्णपणे थांबून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होईल, असा ठाम विश्वास अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Kirit Somaiya On Actor Imran Khan: इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Maharashtra BJP : भाजपच्या जुना जाणत्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’; महाराष्ट्रातील पहिल्या बैठकीत केंद्रीय प्रभारी वैजयंत पांडांनी फर्मान काढलं, म्हणाले...
भाजपच्या जुना जाणत्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’; महाराष्ट्रातील पहिल्या बैठकीत केंद्रीय प्रभारी वैजयंत पांडांनी फर्मान काढलं, म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Embed widget