मुंबई : मुंबईतील (Mumbai) भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत कृती आराखडा तयार करण्याबाबत खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आयुक्त इकबालसिंह चहल (iqbal singh chahal) यांना पत्र लिहिलं आहे. तसेच भटक्या कुत्र्यांकरिता निवारागृह उभारण्याचा प्रस्ताव देखील राहुल शेवाळे यांनी दिला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची तब्बल 65,000 घटनांची नोंद होते. काही दिवसांपूर्वी वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाई (Parag Desai) यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


दरम्यान या भटक्या कुत्र्यांची टोळी लहान मुलांवर, येणाऱ्या जाणाऱ्यांवर आणि जेष्ठ नागरिकांवर हल्ला करतात. त्यामुळे लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, मुंबईत भटक्या कुत्र्यांनी पोस्टमनवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्याच पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांसाठी निवारगृह उभारण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी केलीये. 


पत्रात काय म्हटलं?


भटक्या कुत्र्यांचा त्रास हा दिवसागणिक वाढत चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे या सगळ्यावर काहीतरी उपाययोजना करणं हे नागरिक आणि प्राणी दोघांच्या हिताचं ठरु शकेल. तसेच अनेक रस्त्यावरील अनेक कुत्र्यांना योग्य पोषण मिळत नाही, त्यांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे जर त्यांच्यासाठी निवारागृह उभारणं योग्य ठरेल. हे निवारगृह उभारल्यास प्राण्यांना योग्य निवारा तर मिळेलच पण यामुळे लोकांच्या मनातील भीती देखील काही प्रमाणात कमी होऊ शकते,अशा आशयाचं पत्र राहुल शेवाळे यांनी इकबालसिंह चहल यांना लिहिलं आहे. 


वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई याचं निधन


पराग देसाई अहमदाबाद मधील त्यांच्या घराजवळ इस्कॉन अंबली रोडवर सकाळी वॉक साठी गेले होते, यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी  हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ज्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उपचारांसाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली यामुळे त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. 


दरम्यान आता या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यावर मुंबई महानगरपालिका कोणत्या उपाययोजना करतील हे पाहणं गरजेचं ठरेल. तसेच या पत्रावर मुंबई महानगरपालिकेकडून काय उत्तर देण्यात येणार आणि कोणती पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं राहिल. 


हेही वाचा : 


Wagh Bakri Tea : मोठी बातमी! वाघ बकरी ग्रुपच्या संचालकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पराग देसाई याचं निधन