Parag Desai Passes Away : वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) ब्रँडसाठी प्रसिद्ध गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड (Gujarat Tea Processors & Packers Ltd.) चे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झालं आहे. त्यांनी अहमदाबाद (Ahmedabad) मधील खाजगी रुग्णालयात वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पराग देसाई (Parag Desai) 15 ऑक्टोबर रोजी त्यांचा अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.


वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई याचं निधन


पराग देसाई (Parag Desai) अहमदाबाद (Ahmedabad) मधील त्यांच्या घराजवळ इस्कॉन अंबली रोडवर सकाळी वॉक (Morning Waljk) साठी गेले होते, यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी (Dog Attack) हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ज्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उपचारांसाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली यामुळे त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. 


रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


देसाई (Parag Desai) यांच्या कुटुंबियांनी सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई (Parag Desai) यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटर (Ventilator) वर ठेवण्यात आलं होतं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू आधी त्यांना सात दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं.


पराग देसाई यांचा जीवनपरिचय


पराग देसाई (Parag Desai) गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड (Gujarat Tea Processors & Packers Ltd.) मध्ये कार्यकारी संचालक (Executive Director) पदावर कार्यरत होते. पराग यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधील एमबीए पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. ते वाघ बकरी चहा व्यवसायातील चौथी पिढी होते. त्यांनी वाघ बकरी चहाची विक्री, वितरण आणि निर्यात यामध्ये मोलाची भूमिका बजावत ब्रँडला आणखी उंचीवर नेलं. पराग देसाई यांना वन्यजीवन आणि फिरण्याची आवड होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


PMFBY Scheme : मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार भेट! तलाव, ट्रॅक्टर आणि जनावरांनाही मिळणार पीक विम्याचा लाभ