एक्स्प्लोर
मोनोरेल 1 सप्टेंबरपासून पुन्हा ट्रॅकवर, पण भाडं दुप्पट
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हैसूर कॉलनी स्थानकात डब्ब्यांना आग लागल्यानंतर मोनो रेलची सेवा दहा महिन्यांपासून बंद आहे.

मुंबई : देशातील पहिली मोनोरेल येत्या 1 सप्टेंबरपासून पुन्हा ट्रॅकवर येत आहे. परंतु प्रवाशांना मोनो प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हैसूर कॉलनी स्थानकात डब्ब्यांना आग लागल्यानंतर मोनोरेलची सेवा दहा महिन्यांपासून बंद आहे. मोनोरेल 1 सप्टेंपासून पुन्हा ट्रॅकवर येणार आहे तर दुसरा टप्पा 2 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. देशातील पहिली मोनोरेल मुंबईमधील चेंबूर ते वडाळादरम्यान सुरु करण्यात आली होते. परंतु प्रवासी न मिळाल्याने 8.9 किमीचा पहिला टप्पा तोट्यात गेला होता. प्रतिट्रीप 10,600 रुपयांचा दर प्रतीट्रिपच्या खर्चावरुन आपल्या आणि लार्सन ऍण्ड टुब्रो आणि मलेशियाची स्कोमी इंजिनिअरिंग (एलटीएसई) या कंपनीतील कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने 15 ऑगस्ट रोजी जैन समितीची नियुक्ती केली होती. एलटीएसईने मोनोरेल्वे चालवण्यासाठी एका ट्रिपमागे 18 हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु जैन समितीने 10,600 रुपयांचा दर ठरवला. त्यानंतर एमएमआरडीएने ट्रिपमागे 10, 600 रुपये देण्याचं मान्य केलं आहे. दरम्यान, फेब्रुवारी 2019 पर्यंत मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरु झाला की हा दर आणखी वाढवून देण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2017 पासून सेवा बंद, कोट्यवधींचा तोटा नोव्हेंबर, 2017 मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनो रेलच्या डब्ब्यांना आग लागली होती. यात मोनोरेलचे दोन डब्बे जळून खाक झाले होते. तेव्हापासून मोनोरेलची सेवा ठप्प आहे. मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यात दररोज 18 हजार ते 20 हजार लोक प्रवास करत होते. मोनोरेलची सेवा बंद झाल्याने एमएमआरडीएला दर महिन्याला 1 कोटी 80 लाख रुपयांचा तोटा होत आहे. फेब्रुवारी 2019 पासून दुसरा टप्पा एमएमआरडीए आयुक्त आर.ए.राजीव यांच्या माहितीनुसार, "पहिला टप्पा आम्ही एक सप्टेंबरपासून सुरु करत आहोत. दुसऱ्या टप्प्यासाठी रेकची फिटनेस टेस्ट डिसेंबरपर्यंत पूर्ण केलं जाईल. यानंतर जानेवारी अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करुन 2 फेब्रुवारी, 2019 पासून मोनोरेलचा दुसरा टप्पा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान सुरु केला जाईल."
Before You Go
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं






















