एक्स्प्लोर
मुंबई लोकलमध्ये चोरटे तुमचे मोबाईल असे चोरतात!
डोंबिवली स्थानकावर प्रवाशांच्या खिशातील मोबाईल चोरतानाचा एक व्हीडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.

मुंबई: मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये मोबाईल कसे चोरी होतात, हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
डोंबिवली स्थानकावर प्रवाशांच्या खिशातील मोबाईल चोरतानाचा एक व्हीडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. प्रवासी गाडीत शिरत असताना, गर्दीचा फायदा घेऊन चोरटे अगदी सराईतपणे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल लंपास करतात.
मोबाईल चोरी करणाऱ्यांची एक खास पद्धत असते. प्रवासी स्थानकात आल्यापासून मोबाईल चोर त्याच्यावर पाळत ठेवतात. लोकल आल्यावर तो आपला मोबाईल कुठे ठेवतो ते हेरले जाते. आणि हीच संधी साधत लोकलमध्ये चढत असताना चोरटे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल अगदी सहज चोरतात.
VIDEO:
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























