एक्स्प्लोर

बिग 'बी' बिग 'हार्ट' दाखवा, अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर मनसेची पोस्टरबाजी

जर रस्ता रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगल्याच्या कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळात मनसे मुंबई पालिकेवर तीव्र आंदोलन करेल, अशा देखील इशारा मनसेकडून दिला आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोर (Pratiksha Bungalow)  मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याचं काही भाग जात आहे. या कामात अमिताभ बच्चन यांनी मुंबई महापालिकेचं सहकार्य करावं असं मनसेनं (MNS) पोस्टरच्या माध्यमातून म्हटलं आहे.

मनसेने प्रतिक्षा बंगल्यासमोर काही पोस्टरबाजी लावले आहेत. बिग “बी” आपला “बिग” हार्ट दाखवा, मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच “प्रतीक्षा”, अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जनतेला सहकार्य करावे, अशा आशयाचे पोस्टर परिसरात मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांच्यामार्फत लावण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबईतील जुहू इथल्या संत ज्ञानेश्वर मार्ग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 2017मध्ये मुंबई महानगरपालिकाने आजू बाजूच्या सर्व इमारती आणि बंगल्यांच्या मालकांना त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला. मात्र अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतही उत्तर मुंबई महानगरपालिकेला दिले नाही. दरम्यान 2019 मध्ये महापालिकेने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली गेली. पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही.

मनसे आक्रमक

संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूक कोंडी होते आहे. या वाहतूक कोंडीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर या रस्त्याचे रुंदीकरण झाले तर परिसराती वाहतूक कोंडी आणि लोकांचा त्रास देखील कमी होईल. यासाठी मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिकाने जर या रस्ता रुंदीकरणासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळात मनसे मुंबई महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन करेल, अशा देखील इशारा मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी दिली आहे.

दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईत असलेला जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याच्या भिंती तोडण्याची कारवाई लवकरच होऊ शकते. बंगल्याच्या बाजूचा असलेल्या रस्ता रुंदीकरणासाठी प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेर असलेल्या भिंती तोडण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे.  

प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतींवर तीन वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाने मुंबई महानगरपालिकेने भिंती तोडण्याची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की, आमच्या इमारती बाहेर असलेल्या भिंतीवर तोडक कारवाई झाली. मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर मात्र ते सेलिब्रिटी आणि व्हीआयपी असल्यामुळे कारवाई नाही झाली.

प्रतिक्षा बंगलाच्या शेजारील इमारतींमधील लोकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसापासून मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरचा रस्त्यावर रोड मॅपिंग तसेच मार्किंग करत आहेत. त्यामुळे येणारा काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?
गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड

व्हिडीओ

Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Embed widget