एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई महापालिका शाळांमधील 'वंदे मातरम्' सक्तीला मनसेचा विरोध
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये 'वंदे मातरम्' सक्तीच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि सपानंतर मनसेनं देखील विरोध केला आहे. मुंबई महापालिकांच्या शाळांची दुरवस्था, रोडावणारी पटसंख्या, टॅब आणि शिक्षण साहित्य घोटाळा या सगळ्यांवर लक्ष देण्याऐवजी वंदे मातरमची सक्ती का, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये 'वंदे मातरम्' सक्तीच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि सपानंतर मनसेनं देखील विरोध केला आहे. मुंबई महापालिकांच्या शाळांची दुरवस्था, रोडावणारी पटसंख्या, टॅब आणि शिक्षण साहित्य घोटाळा या सगळ्यांवर लक्ष देण्याऐवजी वंदे मातरमची सक्ती का, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय.
मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये आठवड्यातून किमान दोनदा 'वंदे मातरम्' म्हणण्याचा प्रस्ताव काल महासभेत मंजूर केला. ज्याला एमआयएम आणि सपानं जोरदार विरोध केलाय. यानंतर मनसेनं देखील 'वंदे मातरम्' सक्तीच्या प्रस्तावावरून शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र डागलंय.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, 'वंदे मातरम्' म्हणायला कुणाचाच विरोध नाही. पण ज्या गितानं स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रभक्तीची चेतना सर्व भारतीयांमध्ये निर्माण केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे गीत आजरामर झालं. त्या गीताचा वापर सत्ताधारी स्वत: च्या स्वार्थासाठी करत असतील, तर यातून ते स्वत:चं अपयश लपवत आहेत. कारण सत्ताधारी शाळेचा दर्जा सुधारु शकले नाहीत, त्यावरुन लक्ष्य विचलित करण्यासाठी 'वंदे मातरम्' चा वापर होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे.''
दुसरीकडे महापालिकेच्या प्रस्तावाला समाजवादी पक्षानेही कडाडून विरोध केला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी याला विरोध करताना शिवसेना आणि भाजपवर टीका केली आहे.
‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच 'वंदे मातरम्' गाणार नाही. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका’ असं अबू आझमी म्हणाले होते.
काहीच दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् गाण्याची किंवा वाजवण्याची सक्ती केली. त्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसले.
व्हिडीओ पाहा
संबंधित बातम्या
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये 'वंदे मातरम्' अनिवार्य
शाळा-कॉलेजमध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सक्तीचं : मद्रास हायकोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement