एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरेंच्या गैरहजेरीत मनसेची चिंतन बैठक
मुंबई : मुंबईत मनसेची पुन्हा चिंतन बैठक सुरु आहे. राजगडावर सुरु असलेल्या या बैठकीला मनसेचे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष उपस्थित आहेत.
विशेष म्हणजे या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र हजर नाहीत. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्याला रवाना झाले आहेक.
यामनसेच्या नेत्यांनी स्वत:च या बैठकीचं आयोजन केलं आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील पराभव, पक्षाची गळती तसंच दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीला मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई यांच्यासह अनेत नेते उपस्थित आहेत.
दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत काय घडलं?
दरम्यान दोन दिवसांपूर्वी मनसेची बैठक पार पडली होती. राज ठाकरेंपर्यंत कार्यकर्ता पोहोचत नाही हा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला. शिवाय अनेक विषयात पक्षांकडून राज यांच्या भूमिकाच येत नाहीत, असा आक्षेपही सरचिटणीसांनी नोंदवला होता. तर तुम्ही माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत आहात, असं राज ठाकरेंनी नेत्यांना सुनावलं.
याशिवाय काहीही झालं तरी मराठीचा मुद्दा सोडायचा नाही. निवडणुकीमध्ये मतं मिळोत अथवा न मिळो, मराठीचा मुद्दा टोकाला न्यायचा. सोबतच पक्ष बांधणीसाठी संघटनेत बदल करायचा, असा निर्णयही बैठकी घेतला होता.
संबंधित बातम्या
मनसेच्या बैठकीत नेमकं काय झालं?
मराठीच्या मुद्द्यासह मनसे पुन्हा मैदानात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement