एक्स्प्लोर

Raj Thackeray : 'लॉकडाऊन आवडे सरकारला... सर्व गोष्टी सुरु, मग सणांवरच का येता?' राज ठाकरेंचा सरकारला सवाल 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS Leader Raj Thackeray यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लॉकडाऊन आवडे सरकारला म्हणत सर्व गोष्टी सुरु आहेत, मग सणांवरच का येता? असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे. 

मुंबई : सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. असं असतानाही दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.मुंबईत काही ठिकाणी मनसेनं दहीहंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लॉकडाऊन आवडे सरकारला म्हणत सर्व गोष्टी सुरु आहेत, मग सणांवरच का येता? असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे. 

मनसेनं मध्यरात्रीच फोडली दहीहंडी तर भाजपचे राम कदम म्हणाले, दहीहंडी होणारच 

राज ठाकरे म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही. यांना जे हवंय तेवढं वापरायचं आणि बाकीचं बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायंच. त्यामुळे मी उत्सव साजरा करा असे सांगितले, असं राज ठाकरे म्हणाले. 

ते म्हणाले की,  पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहीहांडी साजरी करायची नाही. माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही तर या सणांवरच तुम्ही कसे काय येता? त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना जोरात दहीहंडी उत्सव साजरा करा जे होईल ते होईल असं सांगितलं होतं, असंही राज ठाकरे म्हणाले.

मनसे कार्यकर्त्यांवर  गुन्हे दाखल केल्याच्या संदर्भात विचारल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, अस्वलाच्या अंगावर केस किती आहेत हे अस्वल किती मोजत नाही. त्याप्रमाणे आमच्या अंगावर केसेस आहेत. हे सर्व सुडबुद्धीने सुरु आहे, असं ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Torrent Power Karjat Project : कर्जतचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, विरोधकांचे फेक नरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
कर्जतचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, विरोधकांचे फेक नरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Sandeep Deshpande: कर्जत, भीभाशंकरमधील झाडांच्या कत्तलींची राज ठाकरे पाहणी करणार, नागरिकांनी शिवतीर्थावर घेतली भेट; तोफ सुद्धा धडाडणार
कर्जत, भीभाशंकरमधील झाडांच्या कत्तलींची राज ठाकरे पाहणी करणार, नागरिकांनी शिवतीर्थावर घेतली भेट; तोफ सुद्धा धडाडणार
Raj Thackeray: राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
Maharashtra FDA Actions News: दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक

व्हिडीओ

Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Accident News: न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
Embed widget