एक्स्प्लोर

Raj Thackeray Rally : औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे मुंबईहून रवाना, स्वागतासाठी मनसैनिकांची जय्यत तयारी

राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याबाबत मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज ठाकरे रस्ते मार्गाने औरंगाबादला जाणार असल्याने ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.

मुंबई : औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून रवाना झाले आहेत. भगवी शाल अंगावर घेऊन राज ठाकरे मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानाहून रवाना झाले. त्यांच्यासोबत मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज ठाकरे रस्ते मार्गाने औरंगाबादला जाणार असल्याने ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. सुरुवातीला चेंबूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांचं त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी केली, फटाके फोडले आणि त्यानंतर अभिवादन स्वीकारुन राज ठाकरे नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांचा आजचा मुक्काम पुण्यात असेल.

नाशिकमध्ये मनसेकडून रिक्षावर राज ठाकरेंचे फोटो चिटकवले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नशिकमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शहरातील रिक्षांवर राज ठाकरे यांची भगवी शाल असलेल्या छबी असलेले स्टिकर चिकटवले जात आहेत. सभा औरंगाबादला जरी असली तरीही नाशिकमध्ये मनसेकडून  वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर असून त्यांनी मनसैनिकांना नोटीस दिली जात आहे

अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. पोलिसांनी अटी-शर्तींसह परवानगी दिली असली तरी राज ठाकरे पोलिसांच्या अटी मान्य करणार का याकडे आता लक्ष लागलं आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेने सभेची जय्यत तयारी केली आहे आणि पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केलाय. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करु नये अशी अट घालण्यात येणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे. पण राज ठाकरे ही नोटीस स्वीकारणार का आणि त्यातल्या अटी मान्य करणार का याबाबत उत्सुकता आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' अटी-शर्ती : 

  • ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे
  • लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
  • इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. 
  • सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
  • 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये 
  • व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
  • सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये
  • वाहन पार्किंगचे नियम पाळावे
  • सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
  • सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
  • सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये

संबंधित बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेवर बंदी घालावी, रिपब्लिकन युवा मोर्चाची औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Aurangabad Raj Thackeray Sabha : अखेर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी; 'या' अटी-शर्तींसह सभा होणार, सूत्रांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Eknath Shinde On Maharashtra School: शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू

Embed widget