एक्स्प्लोर

बीएमसी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडला!

मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून काल 80 वर्षीय आजोबा बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह आज बोरिवली स्टेशनवर सापडला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु होते.

मुंबई : मुंबईतील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय आजोबांचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु होते. हे आजोबा काल (8 जून) पहाटेपासून बेपत्ता होते. आज (9 जून) बोरिवली स्टेशनवर त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान रुग्णालयाच्या निष्काळीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

80 वर्षांचे हे आजोबा मालाड परिसरात राहत होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी पहाटेपासून या आजोबांचे नातेवाईक संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर शेजारच्या बेडवर अॅडमिट असलेल्या एका रुग्णाने फोन उचलला आणि रुग्ण सकाळपासून बेडवर नसल्याचं सांगितलं. "पहाटे साडे पाच वाजताच रुग्ण बेडवर नाही. तसंच रुग्णालयालाही कळवलं आहे," असं त्या रुग्णाने सांगितलं पण तरीही पुढचे काही तास रुग्णालयाने ही घटना गांभीर्याने घेतली नाही. रुग्ण पहाटे बेपत्ता झाल्यानं, सकाळच्या शिफ्टला येणारे कर्मचारी वेगळे असतात. त्यामुळे सकाळपासून नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

याआधीही शताब्दी रुग्णालयाकडून अनेक हलगर्जीपणाच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारावरुन मुंबईच्या रुग्णालयांमध्ये चाललंय तरी काय? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. शताब्दी रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे 80 वर्षीय आजोबा बेपत्ता झाले आणि आज त्यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे या आजोबांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्नही विचारला जात आहे.

रुग्णालयाकडून उडवाउडवीची उत्तरं कोरोना पॉझिटिव्ह आजोबा रुग्णालयातून बेपत्ता झाल्यावर त्यांना धीर देण्याचं काम करण्याऐवजी रुग्णालयाने त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. "तुमचा रुग्ण पळून गेला आहे", असं सांगत रुग्णालयाने हात वर केले होते. रुग्णालयाच्या या उत्तरामुळे नातेवाईक प्रचंड संतापले. 80 वर्षीय व्यक्ती पळूच कशी शकते? जर पळून गेले असतील तर सुरक्षा व्यवस्था कुठे होती? आजोबांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जबाबदार कोण? असे सवाल नातेवाईकांनी उपस्थित केले होते. तसंच रुग्ण पहाटेपासून बेपत्ता असूनही सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची तसदी रुग्णालयाने घेतली नाही. "थोड्या वेळानं या, आता आयटीचे कर्मचारी नाहीत," "बघूया", अशी उत्तरं रुग्णालयाकडून देण्यात आली. याबाबत एबीपी माझानेही रुग्णालयाची प्रतिक्रिया विचारली असताना यावेळीही उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली.

मुंबई महापालिकेने काय म्हटलं होतं? कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय रुग्ण बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेतला जाईल असं आश्वासन महापालिकेने दिलं होतं. "महापालिका प्रशासनाने याची गंभीर नोंद घेतली असून याबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत. रुग्णालयाने याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात कळवले असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गायब रुग्णाचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने एबीपी माझाला दिली होती. परंतु आज त्यांचा मृतदेहच सापडला आहे.

Shatabdi Hospital | शताब्दी रुग्णालयातील बेपत्ता रुग्णाचा मृतदेह बोरिवली स्थानकाबाहेर आढळला

कोरोना रुग्णाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर आढळणं हा तर प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस : संदीप देशपांडे

महत्त्वाच्या बातम्या

आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
NCP Meeting Parth Pawar: राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांनी शब्द दिला, म्हणाले इथून पुढे.....
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांनी शब्द दिला, म्हणाले इथून पुढे.....

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
Embed widget