एक्स्प्लोर

मुंबईत दोन दिवसीय मिसळोत्सव, खवय्यांची तुफान गर्दी

मुंबईकरांना मिसळीची तृष्णा भागवण्यासाठी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाची तशी खास खाद्य संस्कृती आहे. या प्रत्येक पदार्थाची वेगळी लज्जत असली तरीही या सगळ्यात प्रत्येकाच्या जीभेवर रेंगाळणारी चव आहे मिसळीची... मुंबईकरांनाही अशाच वेगवेगळ्या मिसळीची चव एकाच ठिकाणी चाखता येणार आहे. मिसळ हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक दर्जेदार पदार्थ आहे. मूग , मटकीची उसळ , पोह्यांचा चिवडा, वरुन सजवलेलं शेवेचं आवरण आणि थोडंसं शिंपडलेलं लिंबू... कुठल्याही हॉटेलात ही अशी सजवलेली मिसळ पाहिली की जिभेला नक्कीच पाणी सुटतं... त्यामुळे खास मुंबईकरांना मिसळीची तृष्णा भागवण्यासाठी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतील पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाने 9 आणि 10 डिसेंबर या वीकेंडच्या दिवशी सावरकर पटांगणाच्या प्रांगणात हा लज्जतदार मिसळ महोत्सव आयोजित केला आहे. शनिवारी चार वाजता हा महोत्सव सुरु झाला. रविवारीही मुंबईकरांना या महोत्सवाला जाता येईल. या महोत्सवात खवय्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या मिसळीची चव चाखता येणार आहे. vileparle यामध्ये पुण्याची नादखुळा मिसळ, नाशिकची माऊली मिसळ, संगमेश्वरची मुळ्ये मिसळ, विलेपार्ल्याची मामलेदार मिसळ , कोल्हापूरची लक्ष्मी मिसळ , पेणची आप्पा मिसळ आणि लोणावळ्याच्या मनशक्ती मिसळ अशा कित्येक प्रकारच्या मिसळ आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वाट पाहत आहेत. सुट्टीच्या दिवशी मिसळ महोत्सवाचं आयोजन केल्यामुळे या महोत्सवाला लोकांचा सुसाट प्रतिसाद मिळत आहे. तर या चविष्ट मिसळ महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी लोक रांगा लावून कुपन्स खरेदी करत आहेत. सोबतच मिसळचा नेमका शोध कसा लागला, मिसळ सोबत पाव खाण्याचं कॉम्बिनेशन कोणी शोधलं , कुठल्या भागाची कुठली मिसळ प्रसिद्ध आहे अशा अनेक गोष्टींची माहिती आपण तिथल्या स्पीकर वरून ऐकू शकतो. त्यामुळे वीकेंडच्या सुट्टीत काहीतरी चमचमीत, मसालेदार आणि आठवणीत राहणारं खायचं असेल तर या मिसळ महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहायला हवं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विरार वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान भीषण अपघात, अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प
विरार वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान भीषण अपघात, अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला

व्हिडीओ

Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Sushma Andhare on Sheetal Mhatre : खरातला पाणी देण्यासाठी रुपाली चाकणकरांची शिफारस, मग बंदूक कुणी दिली?
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
BCCI Schedule Update : रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
इराणनं होर्मुझवरून घाम फोडला असतानाच आता अरबी समुद्राच्या तोंडावर असणाऱ्या स्ट्रेटवर हल्ल्याचा इशारा! तेथून अमेरिकन एअरबेस फक्त 30 किमी अंतरावर!
इराणनं होर्मुझवरून घाम फोडला असतानाच आता अरबी समुद्राच्या तोंडावर असणाऱ्या स्ट्रेटवर हल्ल्याचा इशारा! तेथून अमेरिकन एअरबेस फक्त 30 किमी अंतरावर!
Sushma andhare on Shital Mhatre: आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
Embed widget