एक्स्प्लोर
महिलेला सात लाखांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक

मिरारोड: घरात पैशांचा पाऊस पाडून देतो असं सांगून महिलेला साडे सात लाखांना गंडवणाऱ्या भोंदू बाबाच्या टोळीला मिरारोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजमल खान, रज्जाक तडवी आणि गोपी गौंड अशी अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबांची नावं आहेत. या टोळीनं मोठ्या चलाखीनं मीरा रोडच्या रहिवासी फेमिदा खान यांना आपल्या जाळ्यात ओढलं. पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून आरोपींनी साडे सात लाख रुपये उकळले आणि पोबारा केला. धक्कादायक बाब म्हणजे मुलीनं लग्नासाठी जमवलेले पैसे फेमिदांनी भोंदू बाबाला दिले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपींना हुडकून काढलं. तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Before You Go
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले






















