एक्स्प्लोर
विरार लोकलमध्ये चौथ्या सीटवरुन प्रवाशाला बेदम मारहाण
चर्चगेटवरुन रात्री 10.18 वाजता सुटलेली विरार गाडी रात्री 11.20 च्या सुमरास मिरारोड इथे पोहोचली. त्यावेळी संबंधित प्रवाशाने जनरल डब्ब्यात तिसऱ्या सीटवर बसलेल्या महिलेला आत सरकण्यास सांगितलं

मिरारोड : विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये मारहाणीचे प्रकार नेहमीच होत असतात. पण रविवारी रात्री चौथ्या सीटवर बसण्यावरुन एका प्रवाशाला बेदम मारहाण झाली. चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या जनरल डब्ब्यात, रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मिरारोड स्टेशनजवळ हा प्रकार घडला.
तिसऱ्या सीटवर बसलेल्या महिलेला आत सरकण्यास सांगून चौथ्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला, महिलेच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
चर्चगेटवरुन रात्री 10.18 वाजता सुटलेली विरार गाडी रात्री 11.20 च्या सुमरास मिरारोड इथे पोहोचली. त्यावेळी संबंधित प्रवाशाने जनरल डब्ब्यात तिसऱ्या सीटवर बसलेल्या महिलेला आत सरकण्यास सांगितलं. पण महिलेसोबत असलेल्या पुरुषांना ह्याचा राग आला आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. मग वादावादीचं पर्यवसन हाणामारीत झालं. यात प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
इतर प्रवाशांनी भांडण सोडवलं खरं, पण हाणामारीदरम्यान, डब्ब्यातील इतर महिला प्रवाशांनाही धक्काबुक्की झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
