Mumbai Meera Road:  संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण असतानाच मीरा रोडच्या (Mira Road Tension) नया नगर (Naya Nagar) परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.  जय श्री रामचा जयघोष करणाऱ्या तरुणांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. यावेळी नयानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही लोकांना ताब्यात घेतलंय. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी नयानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दोन गटात तणाव निर्माण झाल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री मीरा रोडच्या नया नगर परिसरात  दोन गटाच्या रॅली निघाल्या होत्या. या दोन रॅली आमनेसामने आल्यानंतर बाचाबाची झाली त्यांनी परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.मीरा भाईंदर पोलिसांनी परिस्थितीवर काही वेळातच नियंत्रण मिळवले. मात्र सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. दोन गट जेव्हा आमनेसामने आले त्यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.


अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


डीसीपी (झोन -1) जयंत बाजबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोट्या गोष्टीवरून दोन्ही गटात हाणामारी झाली. याशिवाय इथे कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा लक्षात घेता हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी अलर्ट मोडवर आहेत.  शहरात मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.  


मोहित कंबोज यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  मागणी


मीरा रोड येथील दगडफेकीच्या घटनेवर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट केले आहे.  मीरा रोडमध्ये आता बुलडोझर चालवा, अशी मागणी मोहित कंबोज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी केली आहे. एका एका दगडाचे प्रत्युत्तर देणार असेही ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले. 


हे ही वाचा :


सूडाच्या भावनेतून भावकीतील महिलेने चिमुकल्या बहीण-भावाला संपवलं; उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजलं


Maharashtra Naxal : 2010 पासून पुण्यातून बेपत्ता असलेला नक्षली कमांडर पेंटर ससूनमध्ये दाखल; पोलिसांसमोर करणार आत्मसमर्पण