एक्स्प्लोर
LIVE : मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
मीरा-भाईंदर महापालिकेच्या 94 जागांसाठी आज सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या महापालिका निवडणुकीसाठी 509 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेसाठी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून 9 निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. तर मतदानासाठी एकूण 774 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 24 प्रभागांमधील 95 वॉर्डसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, उद्या 94 वॉर्डसाठीच मतदान होईल. एकूण 510 उमेदवार निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. तर काँग्रेसची एक जागा आधीच बिनविरोध झाली आहे. एकूण मतदार किती आहेत?
- एकूण मतदार – 5 लाख 93 हजार 336
- पुरुष मतदार – 3 लाख 21 हजार 770
- महिला मतदार - 2 लाख 71 हजार 549
- इतर मतदार – 17
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























