एक्स्प्लोर
मिरा-भाईंदरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत घराणेशाहीचं वर्चस्व
मिरा-भाईंदर महापालिका महापौरपदाच्या या लढाईत मिरा-भाईंदरच्या महापौरपदी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिम्पल मेहतांची वर्णी लागली.

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत घराणेशाही पाहायला मिळाली. महापौरपदाच्या या लढाईत मिरा-भाईंदरच्या महापौरपदी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिम्पल मेहतांची वर्णी लागली. डिम्पल मेहता या आमदार नरेंद्र मेहतांच्या लहान भावाच्या पत्नी आहेत. त्यांनी शिवसेनेच्या अनिता पाटील यांचा पराभव केला होता. मेहता यांना 61 तर पाटील यांना 34 मतं मिळाली. विशेष म्हणजे, महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेनेची युती पाहायला मिळाली. तर काँग्रेस पुरस्कृत 2 अपक्षांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या बाजूनं मतदान केलं. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये 61 जागी भाजप, शिवसेना 22 जागा, काँग्रेसचा 10 जागी विजय झालाय. तर उपमहापौरपदासाठी चंद्रकांत वैतींची वर्णी लागली. दरम्यान, नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी शहरातील विकासकामांवर भर देणार असल्याचं यावेळी सांगितलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























