एक्स्प्लोर
मिरा-भाईंदर महापालिकेतील 6 नगरसेवक शिवसेनेत

मुंबई: मिरा-भाईंदर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. कारण विद्यमान 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सहा नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं. यामध्ये काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात मीरा भाईंदरमध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्यानं काँग्रेस-राष्ट्रावादीला हा मोठा झटका मानला जात आहे. शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक
- रवींद्र माळी, राष्ट्रवादी
- वंदना चके, राष्ट्रवादी
- सुहास रकवी, काँग्रेस
- हरिश्चंद्र म्हात्रे, काँग्रेस
- सलीम शेख, काँग्रेस
- अरुण कदम, मनसे जिल्हाध्यक्ष पालघर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























