एक्स्प्लोर

निवडणूक लढवणार नाही हे वेगळ्या संदर्भाने म्हणालो: चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यावर आज त्यांना विचारलं असता राजकीय संन्यास घेणार नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

मुंबई: मी कुठलाही राजकीय संन्यास घेणार नाही. मी निवडणुका लढवणार नाही हे वेगळ्या संदर्भाने म्हणालो, असं स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यावर आज त्यांना विचारलं असता राजकीय संन्यास घेणार नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. चंद्रकांत पाटील आज काय म्हणाले? निवडणूक लढणार नाही हा विषय कोल्हापुरात डॉल्बीसंदर्भात भूमिका मांडताना घेतला. गेल्यावर्षी कोल्हापूरमधला गणेशोत्सव डॉल्बीमुक्त केला. काल गणपती अवॉर्डच्या कार्यक्रमात स्थानिक शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की डॉल्बी बंदीमुळे काही मंडळं नाराज झाली. त्यावर मी म्हणालो की यामध्ये माझा काही पर्सनल किंवा पॉलिटिकल अजेंडा नव्हता. कारण मला कुठली निवडणूक लढवायची नाही. मला एखादी सामाजिक भूमिका घेताना त्यात सामाजिक स्वास्थ्य असेल तर मला मतदान नाही झालं किंवा निवडणुकीत अडचण येत असेल तरी चालेल अशी माझी कायम भूमिका आहे.आमच्याकडे राजकीय संन्यास घेणं आमच्या हातात नसतं, ते पार्टी ठरवते. अजून तरी पार्टीने कुठलीही निवडणूक लढू नका असे सांगितलेलं नाही. समाजहिताचे निर्णय घेताना निवडणुकांची भीती बाळगत नाही. गेल्यावर्षी कोल्हापुरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केला. तसा निर्णय हा सामाजिक स्वास्थ्यासाठी घेतला जातो. त्यात राजकारण नसतं. त्यामुळे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव हा निर्णय निवडणुकांच्या तोंडावर घेतोय असं नाही. सध्या निवडणुका नाहीत, त्यामुळे ना मी लोकसभा लढवतोय, ना विधानसभा, ना पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवणार, असं मी म्हटलं होतं. त्यामुळे मी पुढच्या निवडणुकाच लढवणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. माझं कालचं विधान कालच्या घटनेपुरतं मर्यादित होतं. मी निवडणूक लढवावी की नाही हा निर्णय पक्ष घेईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील काल काय म्हणाले होते? कोल्हापुरात ‘गणराया’ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. मी यापुढे कोणतीच निवडणूक लढवणार नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “मला ना लोकसभा, ना विधानसभा, ना पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची. मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही.” चंद्रकांत पाटलांकडे महत्त्वाची खाती चंद्रकांत पाटील हे राज्य भाजपमधील अत्यंत मोठे नेते असून, राज्य मंत्रिमंडळातही त्यांच्याकडे महत्त्वाची मंत्रिपदं आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री अशी तीन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आपलं सार्वजनिक आयुष्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अभाविपच्या माध्यमातून केले.  चंद्रकांत पाटील यांनी सलग तेरा वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम केले. 2004 साली भाजपमध्ये प्रवेश करत, त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. 2008 मध्ये ते पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले. 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर पाटील यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर 2014 साली राज्यात सत्ता आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. सध्या त्यांच्याकडे तीन महत्त्वपूर्ण खाती असून, राज्य मंत्रिमंडळातून वजनदार मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. 2014 पासून ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते सहकार, विपणन, वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख होते. जुलै 2016 पासून, ते 'महसूल, मदत आणि पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री' (सार्वजनिक उपक्रम वगळून) म्हणून कार्यरत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Embed widget