एक्स्प्लोर

म्हाडाच्या घरांची सोडत पुढे ढकलली, नव्या तारखेची लवकरच घोषणा होणार

यंदाच्या सोडतीत एकाच अनामत रकमेत वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. याआधी प्रत्येक अर्जासोबत अनामत रक्कम द्यावी लागत असे.

मुंबई : मुंबईत हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या सोडतीची वाट पाहणाऱ्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने घरांची सोडत पुढे ढकलली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच सोडत जाहीर होईल. म्हडाने मुंबईतील 217 घरांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. या घरांसाठीची सोडत 21 एप्रिल रोजी जाहीर होणार होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. आता घराच्या प्रतीक्षेत असलेल्यांना 23 मे म्हणेजच निवडणूक निकालानंतरच दिलासा मिळणार आहे. आचारसंहितेमुळे सोडतीवर निर्बंध म्हाडाने निवडणुकीपूर्वी 217 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या 217 घरांसाठी बँकेत अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल असल्याचं नमूद केलं होतं. तसंच 21 एप्रिल रोजी वांद्र्यातील म्हाडाच्या मुख्यालयात ऑनलाईन पद्धतीने सोडत जाहीर होणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताही त्वरित लागू झाली. त्यामुळे या कालावधीत म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर करण्यावर निर्बंध आले आहेत. 23 मे नंतरच सोडतीची तारीख जाहीर होणार 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर म्हाडाच्या सोडतीचा मार्ग मोकळा होईल. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने म्हाडाच्या सोडतीची तारीख एक महिन्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी पुढे गेली आहे. घरांची सोडत कधी जाहीर होईल हे 23 मे नंतरच जाहीर होईल, असं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अर्ज भरण्याची मुदत कायम सोडतीची तारीख पुढे गेली असली तरी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचं कळतं. 13 एप्रिल हीच अर्ज सादर करण्याची मुदत आहे. यानंतर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदारांची संख्या वाढण्याची शक्यता म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांची संख्या आतापर्यंत सुमारे 10 हजारांवर पोहोचली आहे. ही संख्या येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व अर्जदारांना सोडतीसाठी जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हं आहेत. 217 घरं आणि 276 गाळ्यांची जाहिरात... या सोडतीचं वैशिष्ट्य : यंदाच्या सोडतीत एकाच अनामत रकमेत वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. याआधी प्रत्येक अर्जासोबत अनामत रक्कम द्यावी लागत असे.
घरांची सोडत
मध्य उपन्न गट (MIG )
पवई - 46 घरं
सहकार नगर चेंबूर 23 - 01 घरं
अल्प उत्पन्न गट (LIG)
सहकार नगर चेंबूर 2 - 64 घरं
सहकार नगर चेंबूर 23 - 41 घरं
सहकार नगर चेंबूर 23 - 13 घरं
सहकार नगर चेंबूर 37- 52घरं
ई-लिलाव माध्यमांतून गाळ्यांची सोडत
प्रतिक्षानगर, सायन - 35
न्यू हिंद मिल, माझगाव - 04
विनोबा भावेनगर, कुर्ला - 14
स्वदेशी मिल, कुर्ला - 05
तुर्भे मंडाले मानखुर्द - 07
तुंगा पवई -05
गव्हाणपाडा मुलुंड - 11
मजासवाडी जोगेश्वरी - 01
शास्त्रीनगर गोरेगाव - 04
सिद्धार्थनगर गोरेगाव - 01
चारकोप भूखंड क्र 1 - 20
चारकोप भूखंड क्र 2 - 19
चारकोप भूखंड क्र 3 - 4
मालवणी मालाड- 69
विरार बोलीज - 57
वेंगुर्ले सिंधुदुर्ग - 20

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget