Mhada Lottery 2024 :: मुंबई मंडळातर्फे एकूण 2030 घरांसाठी सोडतीची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. या प्रक्रियेची जाहिरात निघाली असून अर्ज नोंदणी, स्वीकृतीची प्रक्रिया चालू झाली आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे आता अनेकांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, या सोडतीत सहभागी होताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. म्हाडात घर मिळवून देतो, असे प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवान केले जात आहे. 


सर्व प्रक्रिया असणार ऑनलाईन 


म्हाडाच्या घरांच्या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे घर मिळवून देण्याचा दावा करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जदाराची नोंदणी,आवश्यक कागदपत्रे सादर करे, कागदपत्रांची पडताळणी करणे, अर्ज करणे, अनामत रकमेचा भरणा करणे या संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाईल. विशेष म्हणजे यावेळी अर्जदारांची पात्री ही सोडतीच्या अगोदरच निश्चित होणार आहे. त्यामुळे पात्र ठरलेले  अर्जदारच सोडीत सहभागी होऊ शकणार आहेत. 


बदलांच्या नोंदी अपडेट कराव्या लागणार


म्हाडाच्यो सोडतीत भाग घ्यायचा असेल तर 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे अनामत रक्कम स्वीकारण्याची अंतिम मुदत ही 4 सप्टेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. ज्या अर्जदारांनी याआधीच्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीत सहभाग घेतलेला आहे तसेच ज्यांनी कागदपत्रे अपलोड करून नोंदणी केलेली आहे, त्यांना दरम्यानच्या काळात झालेल्या बदलांच्या नोंदी अपडेट करायच्या आहेत.    


ताडदेवमध्ये सात कोटींना घर 


दरम्यान, यावेळी म्हाडा सोडतीत असलेल्या घरांची किंमत अव्वाच्या सव्वा आहेत. मात्र खासगी बिल्डरांनी उभारलेल्या घरांच्या तुलनेत म्हाडांच्या घरांची किंमत कमी आहे. काही भागात म्हाडाच्या घरांची किंमत ही कोट्यवधी रुपये आहे. अॉन्टॉप हिले येथे अत्यल्प गटासाठी 87 घरे आहेत. या घरांची किंमत 51 लाखांपर्यंत आहे. विक्रोळीमध्ये अल्प गटासाठी 88 घरे आहेत. या घरांची किंमत 67 लाख रुपये आहे. गोरेगावमध्ये मध्यम गटातील घरांची किंमत 1 कोटी 11 लाख रुपये आहे. ताडदेवमध्ये क्रिसेंट टॉवरमधील म्हाडाचे घर 7 कोटी रुपयांना आहे.


हेही वाचा :


MHADA Lottery 2024: म्हाडा लॉटरीत मुंबईतील कोणत्या एरियात घरं, मिडलक्लास आणि हायक्लाससाठी कोणत्या एरियात घरं, उत्पन्नाची मर्यादा किती?


Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करायचा? नेमकी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर माहिती


Mumbai MHADA Lottery 2024: म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा असल्यास 'ही' कागदपत्रं लागणार, अन्यथा अर्ज होणार बाद!