मुंबई या स्वप्नांच्या माझं स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. आता अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण  म्हाडाने (MHADA Lottery) नवी लॉटरी जाहीर केली असून या लॉटरीच्या माध्यमातून तब्बल 2030 सदिनिकांची सोडत जाहीर केली जाणार आहे. या लॉटरीसाठी 9 ऑगस्टपासून नोंदणी करता येणार आहे. नावनोंदणीची प्रक्रिया सुरुदेखील झाली आहे. दरम्यान, या लॉटरीसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या कागदपत्रांची यादी म्हाडाने आपल्या संकेतस्थळावर टाकली आहे. 


म्हाडाने काढलेल्या या लॉटरीमध्ये एकूण चार उत्पन्न गट ठेवण्यात आले आहेत. अत्यल्प उत्पन्न गट (उत्पन्न मर्यादा सहा लाख), अल्प उत्पन्न गट (उत्पन्न मर्यादा नऊ लाख), मध्यम उत्पन्न गट (अत्पन्न मर्यादा 12 लाख रुपये), उच्च उत्पन्न गट (उत्पन्नाची कमाल मर्यादा नाही) अशा प्रकारे म्हाडाने वेगवेगळ्या उत्पन्न गटांमध्ये घरांची वर्गवारी केली आहे. 


अर्जदारांना नोंदणीसाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतील 


म्हाडाच्या या लॉटरीचा लाभ घेण्यासाठी एकूण सहा कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. ती कागदपत्रे खालीलप्रमाणे 


1- अर्जदार विवाहीत असल्यास पती/पत्नी यांचे आधार कार्ड/ पॅन कार्ड


2. अर्जदार अविवाहीत असल्यास स्वतःचे आधार कार्ड/पॅन कार्ड


3. अर्जदार घटस्फोटीत असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपिल दाखल असल्यास त्याची प्रत (अंतिम निकालाच्या प्रती शिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही) आवश्यक आहे. Decree प्रमाणपत्राशिवाय सदनिकेचे वितरण केले जाणार नाही.


4. अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (Domicile Certificate) (अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी 2018 नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे.)


5. अर्जदार विवाहित असल्यास व पती/पत्नी यांचे उत्पन्न असल्यास दोघांच्या उत्पन्नाच्या स्तोत्राकरिता पात्र उत्पन्न गटानुसार दोघांचे दिनांक 01/04/2023 ते 31/03/2024 (Assesment Year-2024-25) मधील आयकर विवरणपत्र अथवा कुटुंबाचा दिनांक 01/04/2023 ते 31/03/2024 तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला.


6. अर्जदार अविवाहीत अथवा पती/पत्नीपैकी एकाचे उत्पन्न असल्यास त्यांच्या उत्पन्नाच्या स्तोत्राकरिता पात्र उत्पन्न गटानुसार दिनांक 01/04/2023 ते 31/03/2024 (Assesment Year - 2024-25) मधील आयकर विवरण पत्र अथवा दिनांक 01/04/2023 ते 31/03/2024 तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला. चुकीचे उत्पन्न सादर केल्याचे निर्दशनास आल्यास सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.


हेही वाचा :


MHADA Lottery Mumbai : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी; आजपासून अर्ज नोंदणी सुरू, 13 सप्टेंबरला निकाल


म्हाडाची लॉटरी जाहीर, कोणत्या गटात किती घरं, किंमत किती, तुम्हाला ही घरं परवडतील का?