Worli Hit And Run Case मुंबई: वरळी हिट अॅड रन अपघात प्रकरणातील  (Worli Hit And Run) मुख्य आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला ओळख परेडमध्ये साक्षीदाराने ओळखल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (09 ऑगस्ट) मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ओळख परेड पार पडली. 


वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहचा वैद्यकीय चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मिहीर शहाच्या रक्तामध्ये अल्कोहोलचा अंश सापडला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. अपघातानंतर पलायन केलेल्या मिहीर शाहला 9 जुलैला अटक झाली होती. त्यावेळी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली होती. त्यात मिहीर शाहच्या रक्तात अल्कोहोलचे अंश सापडले नसल्याचे सांगण्यात आले. 


प्रदीप नाखवा यांनी दिला होता जबाब-


कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांनी आरोपी मिहीर शहाच मोटरगाडी चालवत असल्याचा जबाब दिला होता. त्यानंतर नुकतीच आर्थररोड तुरुंगात शहाची ओळख परेड झाली. त्यात नाखवा यांनी आरोपीला ओळखल्याची माहिती समोर आली आहे. 


नेमकं काय घडलेलं?


7 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता अंधाऱ्या रस्तावरून प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा मासे घेऊन स्कूटरवरून चालले होते. यावेळी मागून अलिशान बीएमडब्ल्यू कारने त्यांना अशी धडक दिली की, प्रदीप नाखवा बोनेटवर कोसळले आणि कावेरी नाखवा चाकाखाली गेल्या. प्रदीप नाखवा यांनी विनवणी करूनही मिहीर शाह थांबला नाही. त्याने कावेरी नाखवा यांना चाकाखाली आलेल्या कावेरी यांनी फरफटत नेलं.  मृत कावेरी या अपघातात कारच्या बंपर आणि चाकामध्ये अडकल्या होत्या. सुमारे दोन किलोमीटर कावेरी यांना तसेच फरफटत आणल्यानंतर वरळी सीफेसला मिहिर शहा आणि शेजारी बसलेला राजऋषी बिडावत यांनी चाकात अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढले आणि तसेच रस्त्यावर टाकले. त्यानंतर आरोपींनी मोटरगाडी बाजूने न नेता कावेरी यांच्या अंगावरून नेली आणि तिथून पळ काढला होता.


ओळख लपवण्यासाठी केस कापले आणि दाढी काढली


अपघात झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी गाडीतच केस आणि दाढी कापल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. आरोपीच्या वडिलांनी अपघाताचा मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. आरोपी कुठल्याही थराला जावू शकतात. न्यायालयात सहानभूती मिळवण्यासाठी आरोपीकडून प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सरकारी वकीलांकडून करण्यात आला होता. 


संबंधित बातमी:


Worli Accident : ओळख लपवण्यासाठी मिहीरने केस कापले आणि दाढी केली, 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी