NCP Ajit Pawar: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी आणि अन्य काही मागण्यांसाठी लढा उभारलेले मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. यासाठी ते राज्यभरात दौरे, शांतता रॅली करत आहेत. सोलापूरमध्ये बोलताना मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना लक्ष्य केलं.
छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल, त्याचा उमेदवार पाडायचा, असं विधान मनोज जरांगेंनी शांतता रॅलीत केलं होतं. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारण्यात आला. छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. यावर अजित पवारांनी 'नो कमेंट्स...', असं उत्तर दिलं. 'एबीपी माझा'शी बोलताना अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
महायुतीच्या यात्रेवर अजित पवार काय म्हणाले?
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकतीच एक बैठक पार पडली. रात्री दीड वाजेपर्यंत ही बैठक चालली. गाव खेड्यातील महायुतीचा कार्यकर्त्यांचा समनव्य रहावा यासाठी 6 विभाग आणि मुंबई एक वेगळा विभाग या 7 विभागात आमचे एकत्रित मेळावे पार पडणार आहेत. मुख्यमंत्,री दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला हजर असतील. 17 तारखेला आम्ही पुण्यात एक कार्यक्रम घेतोय. त्याच कार्यक्रमात महिलांना खात्यावर पैसे जमा होतील. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मेळावे पार पडणार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित-
अजित पवार म्हणाले की, राज्याची आर्थिकस्थिती व्यवस्थित आहे. राज्याचं स्थूल उत्पन्न 43 लाख कोटी रुपये आहे. या उत्पन्नावर आपण किती कर्ज काढू शकतो हे ठरतं. जे आता योजनांसाठी निधीची तरतूद केली ती आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसार केली आहे. आम्ही घेतलेले निर्णय फार विचारपूर्वक घेतले आहेत. अर्थिक स्त्रोत वाढवण्याची देखील तयारी केली आहे. जीएसटी उत्पन्न 30 ते 40 हजार कोटीने वाढलं आहे. केंद्रातून देखील जास्तीत जास्त निधी आम्ही आणत आहोत. टॉयोटो किर्लोस्कर, जिंदाल अशा कंपनींचे 40 हजार कोटींचे प्रकल्प राज्यात येत आहेत. अशी आर्थिक व्यवस्था आम्ही केलेली आहे. तरी देखील आम्हाला विरोधक चुनावी जुमला म्हणत आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली.
मी असं काही बोललो नाही...
लासलगाव येथे बैठक झाली त्या बैठकीत आपण कार्यकर्त्यांना किस्सा सांगितला की आपण पुण्यात नरेंद्र मोदी यांना विनंती केली होती की शरद पवारांवर टीका करु नका...यावर अजित पवार म्हणाले की, मी असं काही बोललो नाही. तुमच्याकडे व्हीडिओ दाखवा. मागे देखील असच माझ्या नावावर खपवण्यात आलं की मी बहुरूपी बनून दिल्लीला जात होतो. मी त्यांना म्हणालो की सीसीटिव्ही व्हीडिओ दाखवा. पण त्यांनी पुरावा दिला नाहीं. आम्हाला राज्यांत फटका बसला कारण संविधान मुद्दा, अल्पसंख्याक बाजूला गेला त्याचा फटका बसला, असं अजित पवार म्हणाले.
संबंधित बातमी:
शरद पवारांबाबत बोलू नये अशी विनंती मी स्वतः मोदींना केली होती, पण त्यांनी 'भटकती आत्मा' म्हटल्यामुळे फटका बसला , अजित पवारांची कबुली