एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पूल दुर्घटनेनंतर इथे येऊ नका असे मीच उद्धव ठाकरेंना सांगितले, महापौरांची सारवासारव
शिवसैनिक आणि जबाबदार पदाधिकारी, शिवसेना नेते, नगरसेवक, मी महापौर त्या ठिकाणी होतो, आम्ही परिस्थिती सांभाळली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे वेळोवेळी परिस्थितीची माहिती आमच्याकडून घेत होते, या घटनेवर त्यांचं पूर्ण लक्ष होतं, असे म्हणत महाडेश्वर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : CSMT पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूस न करता उद्धव ठाकरे प्रचारासाठी अमरावती दौऱ्यावर गेले. यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. पूल दूर्घटनेनंतर इथे येऊ नका असे मीच उद्धव ठाकरेंना सांगितले, असे म्हणत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या घटनास्थळी येण्यानं यंत्रणांवर ताण पडला असता, म्हणून येऊ नका असे सुचवले, असे महापौर म्हणाले. सर्व शिवसैनिक आणि जबाबदार पदाधिकारी, शिवसेना नेते, नगरसेवक, मी महापौर त्या ठिकाणी होतो, आम्ही परिस्थिती सांभाळली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे वेळोवेळी परिस्थितीची माहिती आमच्याकडून घेत होते, या घटनेवर त्यांचं पूर्ण लक्ष होतं, असे म्हणत महाडेश्वर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
या दुर्घटनेला चुकीचा रिपोर्ट देणाऱ्या डी.डी देसाई कन्सलटंट सोबतच महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही दोष आहे. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेतच शिवाय दोन जणांना निलंबितही केले आहे, असेही त्यांनी सांगितले. दुरुस्तीची गरज असतांनाही पूल वेळेत का दुरुस्त केला गेला नाही याची चौकशी होणंही गरजेचं आहे, असेही ते म्हणाले.
CSMT पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूसही नाही, उद्धव ठाकरे प्रचारासाठी अमरावती दौऱ्यावर
दरम्यान, मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे प्रचारासाठी अमरावतीला रवाना झाले होते. सीएसएमटीतील पूल अपघाताला कित्येक तास उलटूनही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे घटनास्थळाकडे फिरकले नव्हते. यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ मुंबई महापालिकेचा पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले. मात्र मुंबईचे कारभारी समजणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घटनास्थळाला भेट देण्याचं किंवा जखमींची विचारपूस करण्याचं सौजन्य दाखवलं नाही.
ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकत आहे, त्याच महापालिकेच्या निष्काळजीमुळे पुलाचा भाग कोसळल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अशा परिस्थितीत उद्धव आणि आदित्य यांनी केलेलं दुर्लक्ष असंवेदनशीलतेचं मानलं जात आहे. निवडणुका तोंडावर आल्याने प्रचाराला जाण्यात काहीच चूक नाही. मात्र ज्या 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे राहतात तिथून घटनास्थळ फक्त 18 किलोमीटरवर आहे. परंतु मतांच्या बेगमीसाठी उद्धव ठाकरेंनी तब्बल साडेपाचशे किलोमीटरवर असलेली अमरावती जवळ केली.
सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई, दोन अधिकारी निलंबित, अन्य दोघांची चौकशी
गुरुवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. या सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. या पुलाच्या ऑडिटसंबंधी जबाबदार दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.
या दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता ए.आर पाटील, सहाय्यक अभियंता एस. एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर मुख्य अभियंता एस. ओ कोरी आणि उपमुख्य अभियंता आर . बी. तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement