एक्स्प्लोर

ठाणे ते सीएसटी सुसाट, मेट्रो 4 चा विस्तार होणार

मुंबई : मेट्रो 2 आणि मेट्रो 7 च्या विस्तारानंतर आता मेट्रो 4 चाही विस्तार होणार आहे. राज्य सरकारने याबाबत घोषणा केली आहे. यामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडच्या नागरिकांना थेट सीएसटीपर्यंत मेट्रोनं प्रवास करणं शक्य होणार आहे. बहुचर्चित वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली या मेट्रो 4 चा पल्ला वाढवण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. मेट्रो 4 आती सीएसटीतील जीपीओपर्यंत वाढवली जाणार आहे. म्हणजेच मेट्रो 4 चा मार्ग आणखी 10 किलोमीटरने वाढणार आहे. मेट्रो 4 कुठून कुठपर्यंत वाढणार? वडाळ्यापासून सुरु होणारी मेट्रो आता थेट सीएसटी रेल्वे स्थानकाजवळच्या जीपीओपर्यंत नेली जाईल. यामुळे मेट्रो 4 चा मार्गात वडाळा ते जीपीओ असा सुमारे 10 किमीचा पल्ला वाढला आहे. हा मार्ग हार्बर रेल्वे मार्गाला समांतर पी डिमेलो मार्गावरुन जाणार आहे. तर दुसरीकडे घोडबंदर मार्गावर कासारवडवलीपर्यंत असलेली मेट्रो 4 ही गायमुखपर्यंत 5 किमीने अंतर वाढवली जाणार आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील आणखी मोठ्या लोकवस्तीला या मेट्रोचा फायदा होईल. मेट्रो 4 चा मार्ग दोन्ही बाजूंनी वाढवला गेला असल्यानं थेट ठाणे ते सीएसटी असा मेट्रो प्रवास भविष्यात शक्य होणार आहे. मेट्रो 4 च्या प्रकल्पाचा मूळ खर्च सुमारे 14 हजार 500 कोटी रुपये होता. मार्ग वाढवल्याने खर्च आणखी 5 हजार कोटी रुपयांनी वाढणार आहे. पण ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो 4 च्या नव्या मार्गाचा प्रकल्प आराखडा काही दिवसांत निश्चित होणार असून, डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मेट्रो 4 चं भूमिपूजन 20 डिसेंबर 2016 ला पंतप्रधानांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Manoj Jarange Patil and Devendra Fadnavis: मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...
मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
Manoj Jarange Patil: कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
Manoj Jarange Patil: 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Embed widget