एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरे कॉलनीत झाडांवरील गणपतीची चित्रं पुसली, मेट्रो 3 च्या अधिकाऱ्यांची मुजोरी
मुंबईत आरे कॉलनीमध्ये मेट्रो 3 म्हणजेच एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांची मुजोरी समोर आली आहे. आरे कॉलनीमध्ये झाडांवर गणपतीचे चित्र काढून झाड़े वाचवण्याचा संदेश देणाऱ्या कलाकारांना एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी रोखलं आहे.
मुंबई | मुंबईत आरे कॉलनीमध्ये मेट्रो 3 म्हणजेच एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांची मुजोरी समोर आली आहे. आरे कॉलनीमध्ये झाडांवर गणपतीचे चित्र काढून झाड़े वाचवण्याचा संदेश देणाऱ्या कलाकारांना एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी रोखलं आहे.
इतकंच नाही तर काही झाडांवर काढलेले गणपतीचे चित्र आणि त्यावरील सेव्ह आरेचे संदेश अधिकाऱ्यांनी पुसून टाकले आहेत. त्यांना याबद्दल कारण विचारले असता, हे एमएमआरसीचे झाड़ असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एमएमआरसीच्या मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधली जमीन घेण्यात आली. त्यावरुन मोठा वादही निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणात झाड़े तोडण्यात येणार असल्याने अनेक संस्थांनी त्याला विरोध केलेला होता. तरीही सरकारने सर्व विरोध झुगारुन या कारशेडला मान्यता दिली होती.
आपला विरोध दर्शवण्यासाठी या संस्थानी अशाप्रकारे झाडावर गणपतीचं चित्र काढून झाडात देव असतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही एमएमआरसीच्या अधिकार्यांनी विरोध केल्याने त्यांची मुजोरी वाढत असल्याचे चित्र आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement