एक्स्प्लोर
आरे कॉलनीत 25 हेक्टरवर मेट्रो 3 चं कारशेड, 3130 झाडांची कत्तल होणार
![आरे कॉलनीत 25 हेक्टरवर मेट्रो 3 चं कारशेड, 3130 झाडांची कत्तल होणार Metro 3 Carshed In Aarey Colony Mumbai Latest Updates आरे कॉलनीत 25 हेक्टरवर मेट्रो 3 चं कारशेड, 3130 झाडांची कत्तल होणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/03/12095618/mumbai_metro-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेनेचा विरोध डावलून आरे कॉलनी मध्येच कारशेड मेट्रो 3 चं कारशेड होणार आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी दिल्लीतील एका दिल्लीतील कंपनीला कंत्राटही देण्यात आलं आहे. पुढील दोन महिन्यात कारशेडचं काम सुरु होणार आहे, तर अडीच वर्षात हे बांधकाम पूर्ण होणार आहे.
कुलाबा ते सीप्झ मेट्रो 3 च्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड प्रस्तावित आहे. आता या कारशेडसाठी दिल्लीतील सॅम बिल्टवेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे. आरे कॉलनीतील कारशेडसाठी 328 कोटींचं कंत्राट देण्यात आलं आहे. पुढील अडीच वर्षाच आरे कॉलनीतील 25 हेक्टर जमिनीवर डेपो बांधण्यात येणार आहे. यात आठ डब्यांच्या 31 रॅक्स बांधण्यात येणार आहेत.
आरे कॉलनीतील या कारशेडसाठी 3130 झाडं तोडली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेसह नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.
आरेतील मेट्रो 3 च्या कारशेडमध्ये...
आरे कॉलनीतील या डेपोमध्ये गाड्या पार्क केल्या जातील,
मेट्रो गाड्या धुतल्या जाणार
मेट्रोची दुरुस्ती केली जाईल
मेट्रो ट्रेंगिंग सेंटर उभारण्यात येईल
प्रशासकीय विभाग असणार
कुलाबा ते सिप्झ दरम्यान धावणाऱ्या मेट्रो 3 मार्गासाठी मुंबई महापालिकेचे 17 भूखंड कायमस्वरुपी देण्याचं प्रस्तावित आहे. यात आरे कॉलनीतल्या हरितपट्ट्याची जागा हा देखील वादाचा विषय आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात सेनेनं हा प्रस्ताव विरोधकांच्या मदतीनं अनेकदा फेटाळून लावला आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा 33 किलोमीटरचा हा मुंबईतला पहिलाच भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पामुळे गिरगाव, दादर भागातील लोक विस्थापित होतील आणि कारशेडमुळे आरे कॉलनीतल्या झाडांची हानी होईल असा दावा शिवसेनेचा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)