Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवलीमध्ये मीटर पद्धतीचा रिक्षा चालकांना जणू विसर पडला असून मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याच्या नियमांकडे रिक्षा चालकांनी पाठ फिरवली आहे. मीटरप्रमाणे रिक्षा प्रवासाची मागणी करणाऱ्या प्रवाशांना सर्रासपणे नाकारलं जातंय. शेअर व्यतिरिक्त रिक्षातून थेट प्रवास करणाऱ्याला मीटर टाकलं जात नसल्यानं किमान भाडंही दुपटीनं द्यावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज कल्याण आरटीओ कार्यालयात आरटीओ पदाधिकारी आणि रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ज्या प्रवाशांची मीटरप्रमाणे प्रवास करण्याची मागणी त्यांना मीटरप्रमाणे भाडं आकारण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती कल्याण आरटीओ अधिकारी विनोद साळवे यांनी दिली आहे. तसेच या निर्णयाची अंमबजावणी येत्या काही दिवसांत सुरू होणार असून मीटरप्रमाणे भाडं नाकारल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील आरटीओकडून देण्यात आला आहे.


मुंबई, ठाण्यात शेअर रिक्षा पद्धत असली तरी तिथेही मीटर बंधनकारक आहे. तर कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) दोन्ही शहरांत बहुतांश रिक्षा स्टॅण्ड शेअर रिक्षाचे आहेत. नियमांनुसार, रिक्षा मीटरप्रमाणं चालवणं अपेक्षित आहे. परंतु, शेअर पद्धतीमुळे रिक्षातील मीटर हे शोभेपुरतेच राहिले आहेत. वर्षभरात रिक्षातील मीटरवर पासिंग होतं, मात्र रिक्षा मीटरप्रमाणे धावत नाहीत. मीटरप्रमाणे रिक्षा चालवण्यास रिक्षा चालक नकार देतात. मीटरप्रमाणे भाडं घेतलं जात नसून थेट भाडं आकारलं जात असल्याच्या अनेक तक्रारी कल्याण आरटीओकडे आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. शेअरिंग पद्धतीनं रिक्षा सुरु असल्या तरी रिक्षातून थेट प्रवास करणाऱ्यासाठी तरी मीटर पद्धत अवलंबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत आज कल्याण आरटीओ अधिकारी विनोद साळवी यांनी आज रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत ज्या प्रवाशांना मीटरप्रमाणे प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडं घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून येत्या काही दिवसांत या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 


दरम्यान, अशा प्रकारे दोन वेळा आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस मीटरनं भाडं नाकारणाऱ्या रिक्षांवर कारवाई देखील करण्यात आली. मात्र कारवाईत सातत्य नसल्यानं रिक्षाचालकांचं पुन्हा फावलं. आता पुन्हा आरटीओकडून झालेल्या बैठकीत मीटर सक्ती करण्यात आली. मात्र रिक्षा संघटनांच्या दबावापुढे या निर्णयाची अंमलबजावणी कितीपत होईल? हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.