Measles Disease : गोवर (Measles) हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, शरीरावर लाल पुरळ येणे ही गोवरची मुख्य लक्षणे आहेत. यावर्षी 2022 मध्ये गोवर उद्रेकाची संख्या जास्तच भितीदायक झाली आहे. 2022 मध्ये गोवरचा उद्रेक 74 पटींनी वाढला आहे.
राज्यातील गोवरची परिस्थिती
राज्यातील गेल्या चार वर्षातील गोवरच्या रूग्णांची परिस्थिती पाहता यंदाची परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक 3 वेळा झाला. तर 2020 मध्ये ही संख्या 2 वेळा झाला. अगदी मागच्या वर्षापर्यंत म्हणजेच 2021 मध्ये गोवरचा उद्रेक केवळ एकदाच झालेला. मात्र, यावर्षी 2022 मध्ये गोवर उद्रेकाची संख्या जास्तच भितीदायक झाली आहे. 2022 मध्ये गोवरचा उद्रेक 74 पटींनी वाढला आहे. यामध्ये 11,390 संशयित रूग्ण आहेत. तर मुंबईत 14 बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे.
गोवरचा उद्रेक कसा होतो?
एका विशिष्ट भागात चार आठवड्याच्या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक गोवर संशयित रूग्ण आढळल्यास आणि त्यापैकी किमान दोन रूग्ण प्रयोगशाळा तपासणीत गोवरबाधित आढळल्यास त्याला गोवर उद्रेक म्हणतात.
काय आहेत गोवरची लक्षणं? (Measles Disease Symptoms) :
ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातील चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुखे लक्षणं आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्युमोनिया, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग असे अनेक आजार निर्माण होऊ शकतात.
संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?
या आजारावर अत्यंत प्रभावी अशी MR आणि MMR अशी लस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. सर्व बालकांना या लसीचे दोन डोस देण्यात येतात. 9 महिने आणि 15 महिने वयोगटात या आजाराचे दोन डोस देण्यात येतात. त्याचबरोबर सेफ ड्रिकींग वॉटर, अजीवनसत्वाची मात्रा, सकस आहार, कुपोषण, कुपोषणावरील उपचार अशी उपाययोजना करून आपण ही साथ थांबवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :