Measles Disease : मुंबईतील (Mumbai) गोवर (Measles) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. मुंबईत गोवरचे एकूण 900 बालके संशयित रुग्ण आहेत. मात्र, गोवर हा आजार नेमका काय आहे? तसेच या आजाराची लक्षणे कोणती? आणि हा आजार होऊ नये यासाठी पालकांनी आणि बालकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
गोवर संसर्गाच्या समस्येबाबत प्राध्यापक बालरोगतज्ज्ञ, एम.जे. मेडिकल कॉलेज नवी मुंबई तसेच नवी मुंबई बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाणे, म्हणतात की, 2022 मध्ये जगभरामध्ये गोवर आजाराचे प्रमाण साधारणपणे वाढले आहे. कोव्हिडमधल्या दोन वर्षांच्या काळात आपले नियमित लसीकरण कुठेतरी लॉकडाऊनमुळे, कोरोनामुळे मागे पडत गेले. आणि या 2-3 वर्षांत जन्मलेल्या बालकांमध्ये याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
काय आहे गोवर संसर्ग?
गोवर ज्याला गोवरी, माता, खसरा, मिजल्स, ओरी अशा विविध नावाने ओळखला विषाणूमुळे होणारा हा आजार आहे. हा अत्यंत संसर्गजन्य असा आजार आहे. हा आजार हवेतून रॉफ्लेट इन्फेक्शन म्हणून पसरतो. हा आजार साधारणपणे सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना जास्त प्रमाणात होतो.
गोवर संसर्गाची लक्षणे कोणती?
सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भिती असते.
गोवर संसर्गावर उपचार काय?
हा आजार बरेचजण अंगावर काढतात. दैवी अंघोळ, जडीबुटी असे उपचार करून पाहतात. असे न करता जेव्हा बाळाला ताप आणि पुरळ येतात तेव्हा त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जाऊन अचूक निदान आणि उपचार करून घ्यावे. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, हायड्रेशन, व्हिटॅमिन ए, पॅरासिटामॉल अशाने हा आजार बरा होतो.
संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?
या आजारावर अत्यंत प्रभावी अशी MR आणि MMR अशी लस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. सर्व बालकांना या लसीचे दोन डोस देण्यात येतात. 9 महिने आणि 15 महिने वयोगटात या आजाराचे दोन डोस देण्यात येतात. त्याचबरोबर सेफ ड्रिकींग वॉटर, अजीवनसत्वाची मात्रा, सकस आहार, कुपोषण, कुपोषणावरील उपचार अशी उपाययोजना करून आपण ही साथ थांबवू शकतो.
व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या :