एक्स्प्लोर

Measles Disease : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी गोवरनं बालकाचा मृत्यू, मुंबई परिसरातील बळींची संख्या 12 वर

Measles Disease Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी गोवरनं बालकाचा मृत्यू. मुंबई आणि परिसरातील बळींची संख्या 12 वर, तर औरंगाबादमध्येही 8 बालकांना गोवरची लागण झाल्याचा संशय.

Measles Disease Updates: मुंबईत (Mumbai News) सलग तिसऱ्या दिवशी गोवर संसर्गानं (Measles Disease) एका बालकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीमधील एका आठ महिन्यांच्या बालकाला अंगावर पुरळ येऊन ताप येत होता. त्या बालकाचा काल मृत्यू झाला. या मृत्यूमुळे मुंबई आणि परिसरातील गोवरमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 12 वर पोहोचली आहे. तर 233 जणांना गोवरचा संसर्ग झाला आहे. मुंबईच्या झोपडपट्टी भागात गोवरच्या  संसर्गाचा धुमाकूळ आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत 35 लाख घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. 

गोवरच्या लशीचं वय कमी करण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. हॉटस्पॉट असलेल्या भागांसाठी हा निर्णय असेल, तसेच लशीसाठी वयाची अट शिथील करण्यासह बूस्टर डोसही देणार असल्याची माहिती एबीपी माजाशी बोलताना भारती पवार यांनी दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोवरच्या लशीसाठी असलेली वयाची अट शिथील करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यासंदर्भात बोलताना केंद्री आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ही माहिती दिली. 

पाहा व्हिडीओ : Govar Measles in Mumbai : गोवर हॉटस्पॉट असलेल्या भागात लशीसाठी वयाची अट शिथील, केंद्राचा निर्णय

औरंगाबादमध्येही वाढता प्रादुर्भाव 

मुंबईपाठोपाठ औरंगाबादमध्येही गोवर संशयित मुलं आढळली आहेत. शहरातील शताब्दीनगर, रहेमानिया कॉलनीत आठवडाभरापासून गोवरची 8 संशयित बालकं आढळून आली आहेत. मुलांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मुंबई येथील हाफकिन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु आहे. मुलांच्या अहवालाकडे आरोग्य विभागाचं लक्ष लागलं आहे. 

ग्रामीण भागातही सर्वेक्षण

मुंबईत उद्रेक झालेल्या गोवर रुग्णांच्या संख्येने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर औरंगाबाद शहरात गोवर संशयित आढळून आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. ग्रामीण भागातील लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी व लसीकरण करण्यासाठी सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली आहे.

गोवर संसर्गाची लक्षणे कोणती? 

सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भिती असते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Measles Disease: औरंगाबाद शहरात गोवरचे 8 संशयित रुग्ण आढळले, आरोग्य विभाग अलर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice Chandiwal : न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटावर अजितदादा,सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Shirsat on Justice Chandiwal | अनिल देशमुखांना क्लीनचिट देण्याचा प्रश्नच येत नाहीPravin Darekar Chandiwal Commission| देशमुखांवर सत्तेचा दबाब, चांदिवाल आयोगावर दरेकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
Embed widget