नवी मुंबई : 2021 हे वर्ष संपत आलं आहे. 2021 वर्षाला निरोप देण्याकरता अवघं जग सज्ज झालं आहे. पण मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटामुळे 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर शासनाने निर्बंध आणले आहेत. दरम्यान अशातच 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी तरुणांना एमडी ड्रग्स विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केलं आहे. यावेळी पोलिसांनी एमडी या अत्यंत हाणिकारक ड्रग्सचा मोठा साठा जप्त केला आहे.


नवी मुंबई पोलसांना 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी एमडी या ड्रग्सचा मोठा साठा शहरात असल्याची माहिती मिळाली होती. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून प्रथम आरोपी कलीम खामकर याला पनवेल येथून ताब्यात घेतले. अधिक माहिती घेतली असता त्याचा सहकारी जकी पिट्टू आणि सुभाष पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत अधिक तपास केला. आरोपी सुभाष पाटील याने केमिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले असल्याने त्याला ड्रग्ज पावडर बनवण्याबाबत ज्ञान होते. तपासाच्या शेवटी या तीनही आरोपींकडून तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांचे अडीच किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. धक्कादायक म्हणजे या आरोपींनी अलिबाग येथील पोयनाड येथे ह्या एमडी ड्रग्सच्या निर्मितीसाठी चक्क एका कारखान्याची निर्मिती केली होती. नवी मुंबई पोलिसांनी या कारखान्यावर कारवाई करत कारखानाही सील केला आहे.





हे ही वाचा : 






LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha