मुंबई :  कोरोना रुग्णांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढतत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल (बुधुवार) राज्यात 3 हजार 900 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. काल मुंबईत 2 हजार 510 रुग्णांची नोंद झाली आहे.  त्यामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमकी काय तयारी करण्यात आली आहे ते पाहुयात.....


कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईत प्रशासन तयारीला लागले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. 


1) एअरपोर्टवर रिस्क कंट्री मधील प्रवाशांचं टेस्टींग करण्यात येत आहे.
2) रेल्वे स्टेशनवर स्क्रिनींग, रॅपीड टेस्ट केल्या जात आहेत. 
3) हेल्थ पोस्ट, वॉर्ड रुम यांच्याकडून नियमांची अंमलबजावणी 
4) वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून 24 बाय 7 बेड्सचे नियोजन
5) महापालिकेकडून विनामूल्य सेवेकरता कोविड सेंटर राखून ठेवली आहेत.
6) मुंबईत 30 हजार बेड तयार, 15 हजार बेड अॅक्टीव्ह
7) सध्या रुग्णसंख्या कमी तरीही ऑक्सिजन, औषधे, बेड यांची तयारी पूर्ण
8) 1 हजार 500 बेड लहान मुलांसाठी तयार केलेत, लहान मुलांकरता विशेष ऑक्सिजन मास्क,  व्हेंटीलेटर यांचीही तयारी केली आहे.
9) परदेशातून आलेल्या, पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांचे जिनोम सिक्वेंसिंग केले जात आहे. 
10) यासाठी कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंसिंग यंत्रणा सज्ज आहे.


 मुंबईतील कोविड रुग्णांसाठी असलेल्या बेडस् ची सद्यस्थिती
1) DCH & DCHC बेड (जास्त लक्षणे वए गंभीर रुग्णांसाठी मध्य लक्षणे व दीर्घकालीन आजार असलेले रुग्णांकरता-  15 हजार 278 
2) सक्रिय CCC2 बेड (लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले रुग्ण) एकुण क्षमता :  14 हजार 118 
3) आयसीयु (ICU) बेड : 1 हजार 986
4) व्हेंटीलेटर बेड (Ventilator Beds) 1 हजार 157 
5) ऑक्सीजन बेड (Oxygen Bed): 6 हजार 790


सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. राज्यात बुधवारी  3 हजार 900 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. तर, राज्यातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 252 वर पोहचला आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईमध्ये काल 2 हजार 510 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 251 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 8 हजार 60 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे मुंबई प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: