Happy New Year 2022 : दर वर्षी लोक नववर्षासाठी संकल्प करतात. आरोग्य, कुटुंब, सवयी आणि स्वभाव या सर्व गोष्टींच्या संदर्भात काही लोक संकल्प करतात. येणाऱ्या 2022 (Happy New Year 2022) या वर्षासाठी हे सोपे संकल्प तुम्ही फॉलो करू शकता.
कमीत कमी 7 ते 8 तास झोप घ्या
वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. रिपोर्टनुसार, कमीत कमी दररोज 7 ते 8 तास झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात निरोगी राहण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेण्याचा संकल्प करा. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहिल.
गरजूंना मदत करा
येणाऱ्या नवीन तुमचे जुने कपडे तुम्ही गरजू लोकांना देऊ शकता. तसेच कोणाची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर त्या लोकांना गरजेच्या वस्तू दान करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता.
व्यसन करणं सोडा
जर तुम्हाला दारू किंवा सिगारेटचे व्यसन असेल तर ते व्यसन सोडण्याचा संकल्प तुम्ही नववर्षासाठी करू शकता.
नवीन गोष्टी शिका
नोकरी किंवा शिक्षणाबरोबरच काही नव्या गोष्टी, नवी कला येणाऱ्या नवीन वर्षात शिकण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. नृत्य, पोहणे, गायन, चित्रकला, हस्तकाल इत्यादी कला तुम्ही शिकू शकता.
व्यायाम करा
शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही दिवसातील थोडा वेळ व्यायाम करण्यासाठी देऊ शकता. दररोज चालणे, सूर्यनमस्कार, योगासन इत्यादी व्यायाम तुम्ही करू शकता.
इतर बातम्या :
Happy New Year 2022: हटक्या पद्धतीने द्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पाठवा भन्नाट स्टिकर्स आणि जीआयएफ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha