Knight Frank : यंदाच्या 2021 या वर्षात मुंबई महापालिकेच्या हद्दीत मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2021 मध्ये मुंबईत 1 लाख 11 हजार 552 खरेद विक्रीच्या व्यवहारांची नोंद झाली आहे. 2020 च्या तुलनेत ही वाढ मोठी असल्याचे नाईट फ्रँकने म्हटले आहे. नाईट फ्रँक ही देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी आहे. 2020 च्या तुलनेत मुंबईत खरेदी विक्रीच्या व्यवहारात 70 टक्क्यांची  वाढ झाली आहे. तर कोरोना महामारीच्या पूर्वी म्हणजे 2019 या वर्षापेक्षा 45 टक्क्यांची वाढ यंदा व्यवहारात झाली आहे.


नाईट फ्रँकने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये डिसेंबर 2021 मध्ये म्हणजे या महिन्यात 9 हजार 320 खेरदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. याआधी 2018 मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले होते. 2018 मध्ये मुंबईत 80 हजार 746 प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले होते. जे मागील काही वर्षातील उच्चांकी खरेदी विक्रीचे व्यवहार होते. डिसेंबरमध्ये झालेले व्यवहार हे मागील महिन्यांच्या तुलनेत 23 टक्क्यांनी जास्त आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मालमत्त खरेदीवर मुद्रांक शुल्क देखील यावर्षी कमी असल्याने खरेदी विक्रीत मोठी वाढ झाली आहे. 2021 च्या खरेदी विक्रीच्या व्यवहार झालेली वाढ ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.


डिसेंबर महिन्यात सर्वात जलदगतीने खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. मागच्या 5 महिन्यांचा विचार केला तर डिसेंबरमध्ये मालमत्ता खरेदी विक्रीच्या नोंदी अधिक झाल्याची माहिती नाईट फ्रँक इंडियाने दिली आहे. राज्यावर कोरोनाचे संकट आहे, मुंबईतही ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तरीसुद्धा खरेदी विक्री व्यवहारात मोठ वाढ झाल्याचे दिसत आहे. या महिन्याचा विचार केला तर पहिल्या 20 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी 293 खरेदी विक्री व्यवहाराच्या नोंदी होत होत्या. मात्र, त्यानंतरच्या 11 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी सरासरी 314 नोंदी होत होत्या. 



कोणत्या वर्षात किती झाले होते खरेदी विक्रीचे व्यवहार


2013 - 64 हजार 242
2014 - 63 हजार 636
2015 - 67 हजार 400
2016 - 63 हजार  255
2017-  68 हजार  659
2018 - 80 हजार  746
2019 - 67 हजार  863
2020 - 65 हजार  633
2021 - 1 लाख 11 हजार  552


अशा प्रकारे मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. यामध्ये सर्वाधीक व्यवहार हे 2021 या वर्षात झाल्याची माहिती समोर आली आहे.


नाइट फ्रँक काय आहे? 


नाइट फ्रँक (Knight Frank) ही एक जागतिक स्तरावरील आघाडीची मालमत्ता सल्लागार कंपनी आहे. लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या नाइट फ्रँकचे 20 हजार कर्मचारी जगातील 60 बाजारपेठांतील 488 हून अधिक कार्यालयांमधून काम करत आहेत. हा समूह व्यक्तीगत मालक व ग्राहक ते प्रमुख विकासक, गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट भाडेकरु यांना सल्ला देतात. भारतात नाइट फ्रँकचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि बंगळुरु, दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्‍नई, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमध्ये 1400 हून अधिक तज्ज्ञ कर्मचारी या कंपनीसाठी काम करत आहेत. बळकट संशोधन आणि विश्लेषणाचे पाठबळ असलेले हे तज्ज्ञ विविध विभागांत (निवासी, व्यावसायिक, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, जमीन व भांडवल) सल्ला, मूल्यांकन आणि कन्सल्टन्सी सेवा पुरवतात. त्याचप्रमाणे फॅसिलिटी व्यवस्थापन व प्रकल्प व्यवस्थापनाच्या सेवाही पुरवतात.


महत्त्वाच्या बातम्या: