Majha Katta | गोष्ट खाण्याची..! मास्टर शेफ संजीव कपूर यांनी सांगितलं स्वयंपाकातलं गुपित
मास्टर शेफ संजीव कपूर आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी स्वयंपाकातलं गुपित सांगितलं आहे.
मुंबई : आपल्याला आपली आवड चांगली माहिती असते. त्यामुळे कोणतंही पक्वान तयार करताना कधी कोणाची नक्कल करु नका. त्यापेक्षा आपल्याला जसं आवडतं तसे पदार्थ बनवण्यास शिका. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आपण काही गोष्टी ठरवून ठेवल्यात आणि त्या आपण कधीच बदल नाही. मला वाटतं हेच आपण बदलायला हवं. आपल्या ठिकाणी ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करुनचं आपण पदार्थ बनवले पाहिजेत. कोणतीही स्थानिक गोष्टी तिथल्या वातावरणासाठी पौष्टीकचं असते, असं गुपित मास्टर शेफ संजीव कपूर यांनी सांगितलंय. संजीव कपूर आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
संजीव कपूर म्हणतात.. आपल्याला आपली आवड चांगली माहिती असते. त्यामुळे कोणताही पदार्थ तयार करताना कधी कोणाची नक्कल करु नका. त्यापेक्षा आपल्याला जसं आवडतं तसे पदार्थ बनवण्यास शिका. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आपण काही गोष्टी ठरवून ठेवल्यात आणि त्या आपण कधीच बदल नाही. मला वाटतं हेच आपण बदलायला हवं. आपल्या परिसरात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करुनचं आपल्याला पदार्थ बनवता आले पाहिजेत. कोणतीही स्थानिक गोष्टी तिथल्या वातावरणासाठी पौष्टीकचं असते.
बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे नव्हत्याच. जसं की बटाटा, मिर्ची. परंपरेसाठी या गोष्टी चांगल्या आहेत. मात्र, आपल्या आवडी खाद्यपदार्थात आणायला शिका, नक्कल करु नका. पाककला ही प्रयोग करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे प्रयोग करत राहा. हे प्रयोग करताना आपल्या आपल्या आवडी लक्षात ठेऊन करा. तुम्ही सर्वात बेस्ट स्वयंपाकी होऊ शकता, असे संजीव कपूर म्हणाले.
लॉकडाऊनमुळे लोकं घरात अडकल्याने आता प्रत्येक घरातून संजीव कपूर बाहेर येताना दिसत आहे. मात्र, ही गोष्टी चांगली आहे. लोकांनी खाद्यपदार्थांमध्ये प्रयोग करायला हवेत. घरात स्वयंपाक करणाऱ्यांना प्रेरणा द्यायला हवी. आपल्याकडे निंदा करण्याची जास्त पद्धत असल्याने लोकं नवीन प्रयोग करायला घाबरतात. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्यांना प्रेरणा द्यायला हवी. गायक जसा एका दिवसात होत नाही, तसेच शेफही एका दिवसात होत नाही. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्यांनाही वेळ द्या. तेही एका दिवसात परफेक्ट होणार नाही. स्वंयपाक करणे ही एक कला आहेच. मात्र, यासाठी याला प्रोत्साहन मिळणेही आवश्यक असल्याचे संजीव कपूर म्हणाले.
यावेळी त्यांनी एक मजेशीरी गोष्टही सांगितली. ते म्हणाले की मिठाईवाले स्वतः तयार केलेल्या गोष्टी खात नाही, असं म्हणतात. पण, मी म्हणतो असे मिठाईवाले काय कामाचे ज्यांना स्वतःच्याच गोष्टी आवडत नाही.