एक्स्प्लोर

दहावीत नापास, मात्र जेईई परीक्षेत पास, झोपडपट्टीतील मासूमची यशोगाथा!

मुंबई: दहावीत नापास झालेल्या एका झोपडपट्टीतील मुलाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर, देशातल्या अवघड समजल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेत यश मिळवलंय. मासूम फारुकी असं या 17 वर्षीय मुलाचं नाव आहे.  मासूम फारुकी हा तीन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता. मात्र न खचता जोमाने अभ्यास करुन मासूमने जेईई परीक्षेत यश मिळवलं. मासूमने 2593 रँक मिळवली आहे. त्यामुळे तो आता नामांकित समजल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीमध्ये इंजिनिअरिंग करणार आहे. मासूमला मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेशाची अपेक्षा आहे. मासूमच्या या यशामुळे त्याचं कुटुंब आणि तीन भावंडं आनंदाने हरखून गेले आहेत. मासूमचं कुटुंब वांद्र्यातील झोपडपट्टीत राहतं. क्रिकेटवेड्या मासूमला क्रिकेटमध्येच करिअर करायचं होतं. त्यामुळे तो नेहमीच मैदानावर पडून असायचा. त्याचाच फटका त्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेत बसला होता. ऑफ स्पिनर असलेल्या मासूमची मुंबईच्या 16 वर्षाखालील संघात निवडही झाली होती. मात्र त्याचं कुटुंब आवश्यक ओळखपत्र देऊ न शकल्यामुळे त्याची संधी हुकली होती. मग मासूमची मोठी बहीण तरन्नूमने त्याची दहावीच्या परीक्षेची तयारी करुन घेतली. नापास झालेल्या मासूमने मग दहावीच्या परीक्षेत तब्बल 78 टक्के गुण मिळवले. मासूमची बुद्धी आणि आत्मसात करण्याची क्षमता ओळखून, तरन्नूमने त्याच्याकडून आयआयटीची तयारी करण्यास बजावलं होतं. त्याचंच फळ म्हणजे जेईई परीक्षेत मिळालेलं यश होय. आयआयटीची तयारी करायचं ठरवलं होतं, मात्र त्यासाठी आवश्यक कोचिंग क्लास आणि त्याची फी हे मासूमच्या कुटुंबाला न परवडणारी होती. त्याचवेळी तरन्नूमने 'रेहमानी मिशन' या संस्थेशी संपर्क साधला. पाटण्यातील या संस्थेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. या संस्थेने मुंबईतील अंजुम ए इस्लाम ट्रस्टच्या मदतीने जेईई परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला होता. या संस्थेने प्रायोगिक तत्वावर मुंबईत मोफत प्रशिक्षण सुरु केलं होतं. त्याचा लाभ मासूमने घेतला. दरम्यान मासूमच्या इंजिनिअरिंगचा सर्व खर्चही हीच ट्रस्ट करणार आहे. अंजुम ए इस्लाम ट्रस्टचे अध्यक्ष झहीर काझी यांनी ही माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget