एक्स्प्लोर

अतिदुर्मिळ आजार असणाऱ्या प्रियांशच्या मदतीला मराठी कलाकार धावले, सढळ हस्ते मदत करण्याचं आवाहन

अतिदुर्मिळ आजाराने ग्रस्त ठाण्यातील प्रियांशच्या मदतीला संपूर्ण मराठी सिनेसृष्टी धावली आहे. अवघ्या 18 महिन्यांच्या चिमुकल्या प्रियांशला AHDS म्हणजेच अॅलन हर्नडन डडली सिंड्रोम नामक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. त्याला ऑक्युपेशनल थेरपीची गरज असून पुढील उपचारासाठी जवळपास सात ते आठ लाख रुपये इतका प्रचंड खर्च येणार आहे.

ठाणे : संपूर्ण जगातील अवघी तेविसावी आणि भारतातील पहिलीच केस असणाऱ्या अतिदुर्मिळ आजाराने ग्रस्त ठाण्यातील प्रियांशच्या मदतीला संपूर्ण मराठी सिनेसृष्टी धावली असून त्यांनी दानशूर नागरिकांना देखील मदतीचे आवाहन केले आहे. 

अवघ्या 18 महिन्यांच्या चिमुकल्या प्रियांशला AHDS म्हणजेच अॅलन हर्नडन डडली सिंड्रोम नामक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. 'X' गुणसूत्रांशी निगडीत असल्याने हा आजार केवळ मुलांमध्येच आढळतो. या आजारात बाळाच्या हालचालीसाठी आवश्यक असणाऱ्या थायरॉईड हार्मोन्स मेंदूपर्यंत पोहोचण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे बाळाची हालचाल मंदावते आणि वय वाढले तरी बाळाला मान धरण्यास कठीण जाते. 


अतिदुर्मिळ आजार असणाऱ्या प्रियांशच्या मदतीला मराठी कलाकार धावले, सढळ हस्ते मदत करण्याचं आवाहन

हा आजार अतिदुर्मिळ असल्याने जगभरात यावर संशोधन सुरु आहे. या आजारावरील गोळ्या केवळ नेदरलँड या देशातून आयात कराव्या लागतात, ज्याचा खर्च लाखात आहे. प्रियांशवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते त्याला ऑक्युपेशनल थेरपीची गरज असून पुढील उपचारासाठी जवळपास सात ते आठ लाख रुपये इतका प्रचंड खर्च येणार आहे. प्रियांशच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे अत्यंत बेताची झाली आहे. अतुल विरकर हे स्वतः नट असून अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी छोट्यामोठ्या भूमिका केल्या आहेत. ते स्वतः पूजा सांगतात. अनेक सिरीयलचे मुहूर्त केलेल्या अतुल विरकरांचे दोन्ही उद्योग कोरोनामुळे बंद असल्याने त्यांना एवढा मोठा खर्च शक्य नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी हात जोडून सर्व दानशूर नागरिकांकडे आपल्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी कळकळीचे आवाहन केलं आहे.

अतुल विरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मराठी कलाकार पुढे आले असून त्यांनी देखील व्हिडीओ क्लिप्सच्या माध्यमातून मदतीचे भावनिक आवाहन केले आहे. वरद विजय चव्हाण, मनीषा केळकर, रमेश वाणी, जयवंत वाडकर, उमेश बोळके, आदिती सारंगधर, विजय पाटकर, कांचन पगारे या कलाकारांना प्रियांशसाठी मदतीचं आवाहन केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासनABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Mahadev Munde case: महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत सापडणार?
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा, भंडाऱ्यातील घटना
Accident : पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
Embed widget